Mula Dam Water : निळवंडे, भंडारदरा, मुळातून विसर्ग थांबवला

Bhandardara Dam : अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळासह भंडारदरा, निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने धरणातून केला जाणारा विसर्ग थांबवला आहे.
Mula Dam
Mula Dam Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळासह भंडारदरा, निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्याने धरणातून केला जाणारा विसर्ग थांबवला आहे. सध्या धरणांतील पाणीसाठा स्थिर ठेवला असून मुळा धरणात ७०.६३ टक्के, भंडारदरा धरणात ७६.१८ टक्के तर निळवंडे धरणात ८७.४० टक्के पाणीसाठा स्थिर आहे.

जिल्ह्यात २६ टीएमसी क्षमतेचे मुळा धरण हे सर्वात मोठे धरण आहे. हरिचंद्र गड परिसरातील पडणाऱ्या पावसावर हे धरण भरते. यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकर पाऊस सुरू झाला. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे धरणातून अधिक पाणी जमा झाले. हरिचंद्रगड परिसरातही जोरदार पाऊस पडल्याने मुळा धरणाच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली होती.

मुळा धरणाचा पाणीसाठा ७०.०३ टक्के (सव्वा अठरा टीएमसी) झाल्यावर धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार १५ जुलैपर्यत ५५ टक्के (१४,३०५ दशलक्ष घनफूट) एवढा नियंत्रित ठेवण्यात आला. मुळा नदीत ३ हजार क्युसेकने विसर्ग सुरु केला होता.

Mula Dam
Bhandardara Dam : भंडारदरा धरणातून सोडला ४ हजार ७११ क्युसेकने विसर्ग

दरम्यान पश्चिम भागातील पावसाचा जोर कमी झाल्याने मुळा धरणातून विसर्ग थांबवला आहे. भंडारदरा, निळवंडे धरणातूनही विसर्ग थांबल्यात जमा आहे. सध्या भंडारदऱ्यातून केवळ ८४० क्युसेक तर निळवंडे धरणातून ३०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

Mula Dam
Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूर्णपणे पाऊस थांबल्याची स्थिती आहे. याशिवाय जिल्ह्यातील अन्य भागातही पंधरा दिवसांपासून पाऊस नाही. पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अजून काही दिवस पावसाने अशीच उसंत दिली तर पिकांवर मात्र गंभीर परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे.

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा (टक्के)

भंडारदरा ७६.१७

निळवंडे ८७.४०

मुळा ७०.६२

आढळा १००

भोजापूर ९६.६८

सीना १००

खैरी ३२

विसापूर १००

मांडओहळ ८७.५३

घोड ९२.९५,

पिंपळगाव जोगा ३३.४७

घाटशीर पारगाव ०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com