Ajit Pawar: अजित पवार यांचा अर्ज राहणार कायम

Malegaon Sugar Factory: माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असून ब वर्ग मतदारसंघातून १३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दौरा २ जूनपासून सुरू होणार आहे.
Malegaon Sugar Factory
Malegaon Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Baramati News: माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत आजवर ब वर्ग संस्था मतदार संघातील १३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. या प्रक्रियेत मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यानुसार आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया १२ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रक्रियेत विशेषतः ब वर्ग संस्था मतदार संघातून २१ उमेदवारांपैकी १३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

Malegaon Sugar Factory
Chhatrapati Sugar Factory: छत्रपती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक

त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे, अॅड.केशवराव जगताप आदींचा समावेश आहे. तावरे यांचा माळेगाव गटातून अद्याप अर्ज कायम आहे, तर जगताप यांचा पणदरे गटातून अर्ज कायम आहे. ब वर्ग संस्था मतदारसंघातून मात्र अजित पवार यांची उमेदवारी कायम राहणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी दिली.

शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर होणाऱ्या पॅनेलमध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादांची उमेदवार आहेत. पक्षाच्या पॅनेलमधून अनेक मातंबर नेते मंडळी व कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांच्यामध्ये मते खेचून आणण्याची क्षमता आहे. परंतु २१ जागा निवडताना पक्षाला मर्यादा येत आहेत.

Malegaon Sugar Factory
Sugar Factory Election : तनपुरे साखर कारखान्याची सत्ता कोणाकडे जाणार

अर्थात अनेक इच्छुकांनी उमेदवारीबाबत अजितदादा जो निर्णय घेतली तो आम्हाला मान्य असेल. सोमवारी (ता.२) राष्ट्रवादी पक्षाच्या पॅनेल प्रचाराचा प्रारंभ अजितदादांच्या उपस्थित माळेगावात होणार आहे,``विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी सांगवी गावात कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत लढणार असल्याचे सांगितले.

तावरे -पवार युती अथवा तडजोडीचा कोणताही विचार नाही. माळेगावच्या निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे तावरे यांनी आवर्जून सांगितले. यावेळी विरोधी गटाचे युवराज तावरे, डॉ. मच्छिंद्र तावरे, डॉ. महेश कोकरे यांनी युवकांच्यावतीने आपली भूमिका मांडली.

सभासदांचा कानोसा घेणार...

माळेगाव कारखाना निवडणूक निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ५८ उमेदवारांसह कार्यकर्ते उद्यापासून (ता. ३१) गट निहाय सभासदांचा कानोसा घेण्यासाठी घराबाहेर पडणार आहेत. युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिहाय दौरा सुरू होणार आहे. तशा पद्धतीचे नियोजन आज शुक्रवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठरले आहे, अशी माहिती शिवनगर शिक्षण संस्थेचे विश्वस्त गणपत देवकाते, गौरव जाधव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com