Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

Cotton Seed Sale : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना १६ मेपासून कापूस बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीची पेरणी मात्र एक जूननंतरच करावी लागेल.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon
Published on
Updated on

Akola News : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना १६ मेपासून कापूस बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीची पेरणी मात्र एक जूननंतरच करावी लागेल. या बाबत स्पष्ट सूचना काढण्यात आली आहे.

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही हंगामात कपाशीचे बियाणे एक जूननंतर शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध व्हायचे. यामुळे एकाच वेळी गर्दी व्हायची. काहीवेळा गैरसोयसुद्धा झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

परिणामी कपाशीचे बियाणे जून आधी उपलब्ध व्हावे अशा स्वरूपाची मागणी शेतकरी, विक्रेत्यांकडूनही झाली. या वेळी धोरणात्मक निर्णय घेत कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांसाठी १६ मे पासूनच बाजारात उपलब्ध राहणार आहे.

Cotton Seed
Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

राज्यात सन २०१७ च्या खरीप हंगामात शेंदरी बोंड अळीने उच्छाद मांडला होता. मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होऊन उत्पादनही घटले होते. तेव्हापासून दरवर्षीच्या हंगामात या बोंडअळीला अटकाव घालण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी केल्या जात आहे.

सन २०१८ ते २०२३ दरम्यान केलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला आहे. आगामी हंगामामध्ये या बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे सूचविण्यात आले आहे.

कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार या बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Cotton Seed
Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

काटेकोर नियोजन करुन अंमलबजावणी

शेतकऱ्यांना या हंगामासाठी लागवड करायचे असलेले कपाशीचे बियाणे १६ मे पासून उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या बियाण्याची लावगड मात्र १ जूननंतरच होईल हे कटाक्षाने पालन केल्यास शेंदरी (गुलाबी) बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होईल.

यासाठी क्षेत्रीयस्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी काटेकोर नियोजन करुन अंमलबजावणी करावी, त्यावर विभागीय कृषी सहसंचालकांनी सनियंत्रण ठेवावे, असे निर्देश काढण्यात आले आहेत.

कापूस बियाण्यांची विक्री दुकानदारांनी शेतकऱ्यांना १५ मेनंतर करावी. शेतकऱ्यांनीही बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एक जूननंतरच पेरणी करावी.
शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com