Cotton Crop : कापूस पिकावर होणार नागपुरात मंथन

Cotton Production : कापूस पिकासाठी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाची वार्षिक आढावा बैठक शुक्रवारपासून (ता. ५) नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
Cotton Crop
Cotton CropAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर : कापूस पिकासाठी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाची वार्षिक आढावा बैठक शुक्रवारपासून (ता. ५) नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित या बैठकीला देशभरातील २५० हून अधिक शासकीय, खासगी संस्थांतील संशोधक, अधिकारी तथा प्रयोगशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ५) वसंतराव नाईक प्रशिक्षण संस्था (वनामती), नागपूर येथे होणार आहे. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीच्या पीक विज्ञान विभागाचे उप महानिदेशक डॉ. तिलक राज शर्मा, सहायक महनिदेशक (बियाणे) डॉ. डी. के. यादवा, केंद्रीय कापूस संशोधन संस्था संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, डॉ. चारुदत्त मायी, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था संचालक डॉ. एस. के. शुक्ला, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या विशेष उपस्थितीसह केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ तथा अखिल भारतीय समन्वित कापूस संशोधन प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. जी. टी. बेहेरे, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने, कृषी महाविद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Cotton Crop
सोयाबीन पिकावर लातुरात होणार राज्यस्तरीय मंथन

दोन दिवसीय या बैठकीत देशभरात कापूस पिकाबाबत सरकारी व खासगी संस्थांद्वारे चालणाऱ्या संशोधनाचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीत नवीन वाण व तंत्रज्ञान प्रसारित करण्यासोबतच कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांवर सांगोपांग चर्चा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात २००५ नंतर प्रथमच अशा प्रकारच्या वार्षिक आढावा बैठकीचे आयोजन होत असून या बैठकीच्या आयोजनाकरिता अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात सहयोगी अधिष्ठाता, नागपूर कृषी महाविद्यालयाचे डॉ. प्रकाश कडू, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (कापूस) डॉ. सुरेंद्र देशमुख, अखिल भारतीय समन्वित कापूस संशोधन प्रकल्प नागपूरचे नोडल अधिकारी डॉ. गणेश बेहरे, यांच्यासह नागपूरच्या कृषी महाविद्यालयातील कापूस संशोधन विभागातील सर्व प्राध्यापक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ परिश्रम घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com