Cotton Procurement : परभणी, हिंगोली जिल्ह्यात १० लाख ५५ हजार क्विंटलवर कापूस खरेदी

Cotton Market : परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यात सीसीआय व खासगी मिळून एकूण १० लाख ५५ हजार ९२० क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
Cotton
CottonAgrowon

Parbhani News : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गत गुरुवार (ता. १) पर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) च्या ७ केंद्रांवर ६८ हजार ११८ क्विंटल व कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्याकडून ९ लाख ८७ हजार ८०२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. या दोन जिल्ह्यात सीसीआय व खासगी मिळून एकूण १० लाख ५५ हजार ९२० क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआयची) परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, ताडकळस या ५ केंद्रांवर एकूण ६३ हजार १३३ क्विंटल व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे १ हजार २८३ क्विंटल शिरडशहापूर (ता. औंढा नागनाथ) येथील केंद्रावर ३ हजार ७०२ क्विंटल मिळून एकूण ४ हजार ९८५ क्विंटल कापूस खरेदी झाली.

Cotton
Cotton Procurement : शहादा येथे कापूस खरेदी पूर्ववत

सीसीआयीची या दोन जिल्ह्यातील ७ केंद्रावर ६८ हजार ११८ क्विंटल कापूस खरेदी झाली. खुल्या बाजारातील दरात सुधारणा झाल्यामुळे सीसीआयच्या खरेदी केंद्रावरील कापूस खरेदीवर झाला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून जाहीर लिलावाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी सुरु आहे.

Cotton
Cotton Market : परभणी बाजार समितीत कापसाला ७३०० ते ८००० रुपयांचा

त्यात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, ताडकळस या ९ बाजार समिती अंतर्गत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये ९ लाख २६ हजार ९३ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व आखाडा बाळापूर बाजार समित्यांतर्गंतच्या ४ जिनिंग कारखान्यांमध्ये ६१ हजार ७०९ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

या दोन जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून ९ लाख ८७ हजार ८०२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. मागील आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७७०० ते ७९०० रुपये दर मिळाले, अशी माहिती पणनच्या सूत्रांनी दिली.

सीसीआय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण कापूस खरेदी

जिंतूर १३५६९

बोरी ११८७७

सेलू १६७८०

मानवत २०१९३

ताडकळस ७१४

हिंगोली १२८३

शिरडशहापूर ३७०२

खासगी कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी

परभणी ७ १४१०९५

जिंतूर ४ १३२२०१

बोरी १ ४२६२२

सेलू ६ २१५१५७

मानवत १३ २९६००७

पाथरी २ १८४५४

सोनपेठ १ २५१८१

गंगाखेड ३ १५८४८

ताडकळस २ ३५९७८

हिंगोली ३ ५६८८५

आखाडा बाळापूर १ ४८२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com