Cotton Procurement : शहादा येथे कापूस खरेदी पूर्ववत

APMC Update : कापूस खरेदी केंद्रावर पूर्ववत कापूस खरेदी सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
Shahada APMC
Shahada APMCAgrowon

Nandurbar News : गेल्या सोमवारपासून (ता. १२) कापूस खरेदी केंद्रावर पूर्ववत कापूस खरेदी सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.

श्री. बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील म्हणाले, की भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) अटी जाचक असल्याने सहसा शेतकरी सीसीआयला माल विकण्यास धजावत नाही; परंतु सीसीआयने रिजेक्ट केल्यावरच परवानाधारक व्यापारी बोली लावून खरेदी करतात.

Shahada APMC
Cotton Procurement Center : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीत वाढ करावी

मात्र खरेदीचे प्रथम प्राधान्य सीसीआयलाच दिले जाते. खरेदी केंद्रावर काही वाद उद्‍भवल्यास तत्काळ बाजार समितीचे संचालक मंडळ व सचिवांमार्फत तो सोडविला जातो. शेतकरी बांधवांनी कुठल्याही प्रकारच्या संभ्रम मनात न ठेवता आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा निश्चितपणे आपला माल चांगला दर्जाच्या असल्यास अधिकाधिक दर मिळेल.

Shahada APMC
Cotton Procurement : कापूस खरेदीसाठी करा दाखल्यानुसार स्थळपाहणी

काही समज, गैरसमज असेल तर संचालक मंडळ किंवा बाजार समितीच्या सचिवांशी संपर्क साधून आपल्या शंकेचे निरसन करून घ्यावे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केंद्रावर काही दिवसांपूर्वी वाद झाला होता आणि हमीभावाप्रमाणे कापसाची खरेदी झाली पाहिजे या दोन विषयांवर मोठ्या प्रमाणावर संभ्रम होता. या दोन्ही विषयांवर जिल्हाधिकारी व डीडीआर कार्यालयात निवेदने पोचली होती.

या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी बाजार समितीतर्फे पत्रकार परिषद झाली. या वेळी सभापती अभिजित पाटील, उपसभापती डॉ. सुरेश नाईक, संचालक जगदीश पाटील उपस्थित होते. या वेळी सभापती अभिजित पाटील म्हणाले, की शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद झाल्यानंतर तत्काळ जीनर्सला कारणे दाखवा नोटीस दिली. जोपर्यंत लेखी खुलासा येत नाही तोपर्यंत बाजार समितीच्या लिलावप्रक्रियेत संबंधित व्यापाऱ्याला सहभागी होता येणार नाही, अशी नोटीस दिलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com