Punjab Traders News : पंजाबच्या धान्य बाजारात व्यापाऱ्यांचा संप, शेतकरी चिंताग्रस्त

Punjab Paddy Traders : पंजाबमधील धान्य व्यापाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
 Traders Strike
Traders StrikeAgrowon
Published on
Updated on

Punjab Farming News : पंजाबमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील सर्व धान्य बाजार बंद (Paddy procurement) राहिल्याने शेतकऱ्यांना हरियाणामध्ये जाऊन धानाची विक्री करावी लागत आहे.

 Traders Strike
Onion Issue : कांदा व्यापाऱ्यांचा बंद मागे; बाजार बंद राहिल्याने तूर्त दर स्थिर

पंजाबमधील धान्य बाजारातील मजूरांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर आता धान्य बाजारातील व्यापाऱ्यांनीही संप पुकारला आहे. असोसिएशनचे पंजाबचे अध्यक्ष विजय कालरा यांनी भगतनवाला धान्य मार्केट येथे असोसिएशनचे अधिकारी आणि कमिशन एजंट यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. सध्या पंजाबमधील बाजारपेठेतील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारातून परत घ्यावा लागत आहे. (Agriculture News in Marathi)

 Traders Strike
Soybean Crop Compensation : सोयाबीन उत्पादकांच्या भरपाईसाठी शरद पवारांना साकडे

विजय कालरा म्हणाले की, केंद्र सरकारने कमिशन एजंटांना दिले जाणारे २.५ टक्के कमिशन बंद करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला आहे. ते म्हणाले की, सरकारकडून पिकांना मिळणारे कमिशन ५५ रुपये प्रति क्विंटलवरून ४६ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. असे करून सरकार कमिशन एजंटांवर अन्याय करत आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे ११ ऑक्टोबरपासून बेमुदत संप सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, पंजाबचे अन्न पुरवठा मंत्री लालचंद कटारुचक यांनी दावा केला की पंजाबच्या जवळपास सर्व धान्य बाजारांमध्ये धानाची खरेदी केली जात आहे. पंजाबमधील बाजारात आतापर्यंत १२ लाख मेट्रिक टन धानाची आवक झाली आहे. आम्ही दररोज वेगवेगळ्या धान्य मार्केटमध्ये जाऊन अधिक खरेदी करत आहोत. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. कोणत्याही शेतकऱ्याला कोणतीही अडचण येणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com