Pune Model School: ‘पुणे मॉडेल स्कूल राज्यभर राबविणार’

Maharashtra Education: मुलांना उत्तम शिक्षण मिळाले तर आत्ताच्या स्पर्धेच्या युगात त्यांना जगाची कवाडे खुली आहेत. ते जागतिक कंपन्यांमध्ये आपली हुशारी सिद्ध करतात.
Pune Model School
Pune Model SchoolAgrowon
Published on
Updated on

Pune News: ‘‘मुलांना उत्तम शिक्षण मिळाले तर आत्ताच्या स्पर्धेच्या युगात त्यांना जगाची कवाडे खुली आहेत. ते जागतिक कंपन्यांमध्ये आपली हुशारी सिद्ध करतात. यामुळे जिल्हा परिषदेचे मॉडेल स्कूल आणि आरोग्य केंद्र ग्रामीण विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य ठरतील. हे मॉडेल राज्यभर राबविले जाईल,’’ असा विश्वास शनिवारी (ता.१४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्हा परिषदेच्या ३०३ मॉडेल स्कूल आणि आरोग्य केंद्रांच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणासाठी विविध उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीचे सामंजस्य करार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार माऊली कटके, बाबाजी काळे, सुनील शेळके, शंकर मांडेकर, बापू पठारे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

Pune Model School
Educational Crisis: बदलत्या शिक्षण पद्धतीला जबाबदार कोण?

श्री. पवार म्हणाले, की राज्य सरकार अंगणवाडी ते पदव्युत्तर शिक्षणावर राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे १ लाख कोटींची तरतूद करत आहे. मात्र अद्यापही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लिहिता-वाचता येत नाही हे दुर्दैव आहे. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी देखील झोकून काम करणे गरजेचे आहे.

Pune Model School
Illegal Fertilizer : श्रीरामपूर, राहुरीला साडेदहा लाखांचे बेकायदा खत जप्त

शालेय शिक्षण मंत्री भुसे म्हणाले, की मराठी शाळांचा दर्जा आणि गुणात्मक वाढीसाठी मराठी माध्यमातून सीबीएसीचे शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी आम्ही राज्यभरातील गुणवंत शिक्षकांची थिंक टँंक तयार करीत असून, शाळांना ३६५ दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहोत.

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणासाठी उभे राहिल्यानंतर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. श्री. पवार यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना राज्य सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच शुक्रवारी (ता.१३) महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री. कडू यांची घेतलेल्या भेटीची आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. तरीही आंदोलक शांत होत नसल्याने पोलिसांना त्यांना सभागृहाबाहेर काढावे लागले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com