
Parbhani News : जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामात मिळून एकूण २ हजार २५३ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात १ लाख ४३ हजार ६१३ शेतकऱ्यांना १ हजार ११० कोटी ६९ लाख १७ हजार रुपये पीककर्ज वाटप झाल्याने ४९.२९ टक्के उद्दिष्ट साध्य झाले.
खरिपात १ हजार ४७० कोटी ९७ लाख रुपये पैकी ७८४ कोटी ५० लाख १७ हजार रुपये (५३.३३ टक्के) तर रब्बी मध्ये ७८२ कोटी ३ लाख रुपये पैकी ३२६ कोटी १९ लाख रुपये पीककर्ज वाटप झाल्याने ४७.७१ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. सलग सहाव्यावर्षी पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती झाली नाही.
२०२४-२५ च्या खरिपात जिल्ह्यातील १७ बँकांना १ हजार ४७० कोटी ९७ लाख रुपये उद्दिष्ट असतांना प्रत्यक्षात ९६ हजार १०७ शेतकऱ्यांना ७८४ कोटी ५० लाख १७ हजार रुपये (५३.३३ टक्के) पीककर्ज वाटप झाले. जिल्हा बँक व महाराष्ट्र्र ग्रामीण बँक या दोन बँकांनीच उद्दिष्ट साध्य झाले.
जिल्हा सहकारी बँकेने १७२ कोटी ९४ लाख रुपये उद्दिष्ट असतांना ३९ हजार ९१२ शेतकऱ्यांना १८२ कोटी ५४ लाख ८६ हजार रुपये (१०५.५६ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २२७ कोटी ३९ लाख रुपये उद्दिष्ट असतांना प्रत्यक्षात २२ हजार ५०९ शेतकऱ्यांना २३१ कोटी ८१ लाख ६४ हजार रुपये (१०१.९५ टक्के) कर्ज वाटप केले आहे.
राष्टीयीकृत बँक व खाजगी बँकांचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. राष्ट्रीयकृत (व्यापारी) बँकांनी ९४७ कोटी ८८ लाख उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात३१ हजार ९३९ शेतकऱ्यांना ३३६ कोटी १४ लाख २८ हजार रुपये (३५.४६ टक्के) तर खाजगी बँकांनी १२२ कोटी ७६ लाख रुपये उद्दिष्ट असतांना प्रत्यक्षात १ हजार ७४७ शेतकऱ्यांना ३३ कोटी ९९ लाख ३९ हजार रुपये (२७.६९ टक्के) पीककर्ज वाटप केले.
रब्बीत ७८२कोटी ३ लाख रुपये उद्दिष्ट असतांना प्रत्यक्षात ४७ हजार ५०६ शेतकऱ्यांना ३२६ कोटी १९ लाख रुपये (४१.७१ टक्के) वाटप झाले. केवळ जिल्हा सहकारी बँकेने १७२ कोटी ९२ लाख रुपये उद्दिष्ट असतांना ३६ हजार २१७ शेतकऱ्यांना १७४ कोटी ९६ लाख रुपये (१०१.१८ टक्के) वाटप करुन उद्दिष्ट साध्य केले.
राष्ट्रीयीकृत बँकांनी ४४४ कोटी ९ लाख रुपये उद्दिष्ट असतांना ८ हजार ९६५ शेतकऱ्यांना १०७ कोटी ८४ लाख रुपये (२४.२८ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १०७ कोटी २१६ लाख रुपये उद्दिष्ट असतांना प्रत्यक्षात१ हजार ३२६ शेतकऱ्यांना १४ कोटी ४१ लाख रुपये (१३.४५ टक्के), खाजगी बँकांनी ५७ कोटी ८६ लाख रुपये उद्दिष्ट असतांना प्रत्यक्षात ९९८ शेतकऱ्यांना २८ कोटी ९८ लाख (५०.०९ टक्के) टक्के) पीककर्ज वाटप केले.
परभणी जिल्हा तुलनात्मक पीककर्ज वाटप स्थिती (रक्कम कोटी रुपये)
वर्षे उद्दिष्ट वाटप टक्केवारी
२०१९-२० १७८४.०० ४२४.१६ २३.८३
२०२०-२१ २१०७.०७ १३५१.८० ६४.२०
२०२१-२२ १८२०.२० ११९१.९१ ६५.४८
२०२२-२३ १८२८.९५ १४५३.३३ ७९.४६
२०२३-२४ २१२९.९० १३३५.३५ ६२.७२
२०२४-२५ २२५३.०० १११०.६९ ४९.२९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.