
Washim News : आर्थिक वर्षाच्या शेवटी ३१ मार्चपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तीन लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जावर व्याज आकारल्या जात नाही. परंतु त्यानंतर पीककर्जाचा भरणा करणाऱ्या खातेदारांना मूळ रकमेवर १० टक्के व्याज आकारल्या जाते. यंदाच्या खरीप हंगामातील नापिक आणि शेतीमालाचे पडलेले दर यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडल्याने ३१ मार्चपर्यंत काही शेतकरी पीककर्जाचा भरणा करू शकले नाही.
त्यामुळे ३१ मार्चनंतर पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ४ टक्के दराने व्याजवसुली करून कर्जाची परतफेड करून घ्यावी, असा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. या व्याज सवलतीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड यांनी आवाहन केले आहे.
खरीप आणि रब्बी हंगाम सन २०२४-२५ या वर्षासाठी अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने कांरजा तालुक्यात ६२ सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५८१३ सभासदांना यंदा पीककर्जाचे वाटप करण्यात आले.
३१ मार्चपूर्वी ३ लाख रुपयांपर्यंत कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफी दिल्या जाते. कारंजा तालुक्यातील ८२ टक्के खातेदारांनी ३१ मार्चपूर्वी आपल्याकडील पीककर्जाचा भरणा केला. परंतु उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी रकमेची जुळवाजुळव न झाल्याने कर्ज भरणा बाकी आहे.
बँकेकडून ३१ मार्चनंतर मूळ रकमेवर १० टक्के व्याज आकारल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी बँकेच्या बैठकीत येत्या १० जूनपर्यंत कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ४ टक्के व्याज आकारण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. बँकेच्या या निर्णयाचा खातेदारांना मोठा फायदा होणार असून व्याजाचा बोजा कमी होणार आहे.
खातेदारांनी व्याज सवलतीचा लाभ घ्यावा..
३१ मार्चनंतर पीककर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दहा टक्के व्याज आकारून पीककर्जाचा भरणा करून घेतल्या जातो. परंतु यंदा मात्र तशी परिस्थिती नसल्याने ३१ मार्चनंतर पीककर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ ४ टक्के व्याजदराने कर्जाचा भरणा करून घेतल्या जाणार आहे.त्यामुळे१० जून पूर्वी आपल्याकडील पीककर्जाचा भरणा करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.