
Parbhani News : परभणी ः नाबार्ड (राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक), सहकार आयुक्त, निबंधक यांनी दिलेल्या सूचनेनुसार २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार हंगामी पिके, बागायती पिके, फळे, भाजीपाला पिकांसाठी प्रतिहेक्टरी कर्जदर (स्केल ऑफ फायनान्स) तसेच शेतीपुरक व्यवसायासाठी आवश्यक खेळत्या भांडवलासाठी कर्जदर निश्चित करण्यात आले आहेत.
या वर्षी कपाशी, तूर, मूग, ज्वारी, ऊस, बटाटा, आंबा, लिंबू, द्राक्षे कर्जदरात वाढ करण्यात आली. नाबार्डच्या संभाव्य पतपुरवठा योजनेत (पीएलसीपी) परभणी जिल्ह्यात २०२५-२६ मध्ये खरीप आणि रब्बी हंगामात मिळून एकूण २ हजार ६५० कोटी ५ लाख ११ हजार रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टाचा समावेश आहे.
जिल्हास्तरीय तांत्रिक समिती आणि राज्यस्तरीय तांत्रिक समितीने शिफारशीत कर्जदरात समन्वय साधून चालू आर्थिक वर्षासाठी विविध पिकांसाठी प्रतिहेक्टरी कर्जवाटप तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय,रेशीम शेती, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, लाख शेती या शेतीपूरक व्यवसायासाठी खेळते भांडवल कर्जदर निश्चित केले.त्यास जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने मंजुरी दिली. गत वर्षीच्या तुलनेत यंदा खरिपातील जिरायती कापूस कर्जदरात हेक्टरी २ हजार ५०० रुपये तर बागायती कपाशी कर्जदरात १ हजार २५० रुपयांनी,तुरीच्या कर्जदरात २ हजार रुपये,मूग,ज्वारीच्या कर्जदरात ५०० रुपये वाढ करण्यात आली.
सुरू उसाच्या कर्जदारात हेक्टरी २ हजार ५०० रुपये,आडसाली ऊस १५ हजार रुपये वाढ, बटाटा कर्जदरात ५ हजार रुपये, लिंबू कर्जदरात २ हजार ५०० रुपये,आंबा कर्जदरात २५ हजार रुपये, तर द्राक्षात ४८ हजार २२५ रुपये वाढ करण्यात आली. सोयाबीन, उडीद, हळद, केळी, संत्रा, मोसंबी तसेच रबी पिकांच्या कर्जदारात वाढ नाही असे जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांनी सांगितले.
केसीसी अंतर्गंतशेतीपूरक व्यवसाय
खेळते भांडवल कर्जदर
दुग्धव्यवसाय १ गाय-म्हैस (३५०००-३७०००), शेळी, मेंढी १० अधिक १ (३८५००),कुक्कटपालन (बॉयलर) १००० पक्षी(३१००००), कुक्कुटपालन अंडिउत्पादन १०० पक्षी (५१७००), मत्स व्यवसाय (१ हेक्टर शेततळी) (३०००००), मत्स्यव्यवसाय तलाव,नदी (५००००), रेशीम किटक संगोपन (१४००००), मधुमक्षिकापालन प्रति १० पेट्या (९०००).
२०२५-२६ वर्षासाठी निश्चित पीकनिहाय
हेक्टरी कर्जदर (कंसात रुपये)
खरीप जिरायती पिके ः कापूस (६७५००),सोयाबीन (६२५००),तूर (४७०००),मूग (२८०००),उडीद (२८५००),ज्वारी (३३०००),बाजरी (३५०००),मका (३७५००),भात (६८०००),भुईमूग (५००००),सूर्यफूल (३००००).
रब्बी पिके ः ज्वारी (३६२५०),गहू (५००००),हरभरा (४००००),करडई (३५०००).
हंगामी बागायती पिके ः कापूस (८३७५०),बी.टी.कापूस (८७५००),कापूस ठिबक सिंचन (८७५००),उन्हाळी भुईमूग (५५०००).
बारमाही बागायती पिके ः सुरु ऊस (१४५०००), पूर्व हंगामी ऊस (१४५०००),आडसाली ऊस (१६५०००),खोडवा ऊस (१२५०००),केळी (१२५०००),केळी टिश्यू कल्चर (१६२५००),हळद (१३००००),बटाटा (८५०००).
फळपिके ः संत्रा-मोसंबी (१०००००),आंबा (१८००००,द्राक्षे (३७५०००),पेरू (७५०००),लिंबू (८००००),सीताफळ (७००००),डाळिंब (१६००००),चिकू (१०००००),आवळा (४५०००),पपई (८५०००),बोर (४५०००),नारळ (१२००००),ड्रॅगन फ्रूट (१८००००),अॅवोकॅडो (३३७५००).
भाजीपाला पिके ः कांदा (८००००),कांदा बिजोत्पादन (८५०००),आले (११००००),वांगी (६७५००), टोमॅटो (९६०००),मिरची (८५०००),दोडका (५५०००),कारले (५२५००),काकडी (४८७५०),भेंडी (६४७००) कोबी (४५०००).फुलझाडे ः अॅस्टर, शेवंती गुलाब, झेंडू, मोगरा,जाई (५००००).
इतर पिके ःतुती (१४००००),पानमळा (७५०००).
शेडनेट,पॉलिहाऊस संरक्षित शेती पिके कर्जदर (प्रति १० गुंठे क्षेत्रासाठी) ः गुलाब, लिलियम (४२६०००), जरबेरा, कार्नेशन (६१००००), अॅलोवेरा,ऑरचिड (७०००००),ढोबळी मिरची (१५००००).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.