Rabi Crop Loan : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरण अपूर्णच

Rabi Season : खानदेशात आता खरिपासंबंधी पीककर्ज वितरण सुरू आहे. परंतु रब्बीतील पीककर्ज वितरण लक्ष्यांक या वेळेसही पूर्ण झाला नाही.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात आता खरिपासंबंधी पीककर्ज वितरण सुरू आहे. परंतु रब्बीतील पीककर्ज वितरण लक्ष्यांक या वेळेसही पूर्ण झाला नाही. राष्ट्रीयीकृत बँका हे कर्ज देण्यासंबंधी दरवर्षी हात आखडता घेत आहेत.

धुळे - नंदुरबार जिल्हा बँक, जळगाव जिल्हा बँकेने खरिपासाठी पीककर्ज वितरण लक्ष्यांक निश्‍चितीनंतर प्रस्ताव वेगात स्वीकारले व कर्ज वितरण वेळेत केले. पण रब्बीसाठी या बँकेला पीककर्ज वितरण लक्ष्यांक नाही. जळगाव जिल्हा बँकेला याबाबत लक्ष्यांक होता. त्यानुसार बँकेने कार्यवाही केली.

खरिपात जिल्हा बँकेला यंदा सुमारे एक हजार ५० कोटी रुपये पीककर्ज वितरण सप्टेंबर २०२४ पर्यंत करायचा होता. धुळे - नंदुरबार जिल्हा बँकेला सुमारे २४१ कोटी रुपये पीककर्ज वितरण केले. या दोन्ही बँकांनी लक्ष्यांकातील १०० टक्के पीककर्ज वितरण जवळपास पूर्ण केले. रब्बीतही कर्ज वितरणात आघाडी घेतली. पण रब्बीत राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांनी पीककर्ज वितरणात चांगली कामगिरी केली नाही.

Crop Loan
Crop Loan Target : अमरावतीत पीककर्जाचा २१०० कोटींचा प्रस्तावित लक्ष्यांक

मागील वेळेस रब्बीतही ६० टक्केच पीककर्ज वितरण झाले होते. गेल्या खरिपातही गती संथ राहीले. पीककर्ज वितरण प्रशासनाने निश्‍चित केलेल्या लक्ष्यांकाएवढे वितरित झालेले नाही, अशी स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ७५० कोटी रुपये पीककर्ज वितरण अपेक्षित होते. तर धुळे - नंदुरबारात मिळून सुमारे ३२५ कोटी रुपये पीककर्ज वितरण अपेक्षित होते.

नंदुरबारात स्टेट बँक अग्रणी बँक आहे. जळगावात सेंट्रल बँक अग्रणी बँक आहे. या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रीयीकृत बँकांकडून सातत्याने राष्ट्रीयीकृत बँकांना व अन्य बँकांना पीककर्ज वितरणाबाबत आवाहन करण्यात आले. परंतु कार्यवाही गतीने झाली नाही.

Crop Loan
Crop Loan Limit: पीककर्ज मर्यादेत १६ ते १६१ टक्क्यांपर्यंत वाढ

तसेच अनेक शेतकऱ्यांचे नवे पीककर्ज प्रस्ताव बँकांत पडून होते. शेतकरी नाराज असून, पीककर्ज देताना फक्त सातबारा, आठ अ आणि अलीकडच्या दोन वर्षातील फेरफार नोंदीच मागण्याचा अधिकार बँकाना असावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. रब्बीचे पीककर्जही १०० टक्के वितरित न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सीबिल स्कोअरची तपासणी सुरूच

राष्ट्रीयीकृत व खासगी बँका पीककर्ज देताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर व सीबिल रिपोर्ट तपासत आहेत. सीबिल रिपोर्टमध्ये शेतकऱ्याने अन्य बँकांकडून पीककर्ज घेतले आह का, फेरफार नोंदी व अन्य माहिती तपासून सिबिल रिपोर्ट तयार केला जात आहे. शासनाने सीबिल पीककर्जासाठी महत्त्वाचे नाही, असे म्हटले आहे. तरीदेखील राष्ट्रीयीकृत बँका सिबिलची कटकट कायम ठेवत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com