Vegetable Market : सोलापुरात टोमॅटो, वांगी, सिमला मिरचीच्या दरात सुधारणा

Market Update : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात टोमॅटो, वांगी, सिमला मिरचीची आवक बऱ्यापैकी राहिली.
Tomato and Brinjal
Tomato and BrinjalAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात टोमॅटो, वांगी, सिमला मिरचीची आवक बऱ्यापैकी राहिली. पण मागणी असल्याने त्यांच्या दरातही चांगली सुधारणा झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Tomato and Brinjal
Vegetable Market : फरसबी २५० रुपये किलो

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची रोज आवक ४०० ते ५०० क्विंटल, वांग्याची २० ते ३० क्विंटल आणि सिमला मिरचीची ३० ते ५० क्विंटलपर्यंत आवक राहिली. स्थानिक भागातूनच ही आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये, तर वांग्याला किमान ४०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये तर सिमला मिरचीला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला.

Tomato and Brinjal
Cotton Soybean Market : कापूस, मूग, सोयाबीनमध्ये उतरता कल

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांच्या आवक आणि दरात चढ-उतार होतो आहे. पण मागणी असल्याने या सप्ताहात दरात सुधारणा झाली. त्याशिवाय कोथिंबीर, मेथी, शेपू, काकडी आणि गाजर यांनाही चांगला उठाव मिळाला. त्यांचे दरही संपूर्ण सप्ताहभर स्थिर राहिले. भाज्यांची आवक रोज प्रत्येकी १० ते २० हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. तर काकडीची रोज १० ते २० क्विंटल आणि गाजराची ५ ते १० क्विंटल आवक झाली.

कांद्यालाही उठाव

गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी होत आहे. परंतु मागणी असल्याने कांदा दरातही काहीशी सुधारणा झाली आहे. कांद्याची रोज ५० ते ७० गाड्यांपर्यंत आवक राहिली. कांद्याची आवक बाहेरील जिल्ह्यातून झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com