Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी प्रश्नी जानेवारीत एल्गार मेळावा

Farmer Issue on Onion Export Ban : कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील कांदा पट्ट्यात केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट कायम आहे.
Onion
Onion Agrowon
Published on
Updated on

Nashik News : कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील कांदा पट्ट्यात केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट कायम आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातबंदी प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना,

प्रहार जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटना यांची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात रविवारी (ता. २४) बैठक झाली. जानेवारी महिन्यात संयुक्त एल्गार महामेळावा घेण्याची घोषणा करण्यात आली.

Onion
Onion Ban Export : कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना एक हजार कोटींचा फटका

जानेवारी महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ३० एकर जागेत हा महामेळावा होणार आहे. तसेच लढा उभारण्याचा निर्धार करण्याची माहिती समविचारी शेतकरी संघटनेचे समन्वयक निवृत्ती गारे-पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारने ८ डिसेंबरला घेतलेल्या निर्यातबंदीमुळे ३५०० ते ४००० रुपये क्विंटलप्रमाणे विकला जाणारा कांदा निर्यातबंदी नंतर अचानक १५०० ते १६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे मोठा फटाका कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदांराना सहन करावा लागत आहे.

त्यामुळे वातावरण तापले असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नवीन वर्षात कांदा उत्पादकांचा राज्यव्यापी संयुक्त एल्गार मेळावा घेण्यासाठी ही बैठक झाली. अॅड. उत्तम कदम अध्यक्षस्थानी होते. या वेळी केंद्र सरकारच्या निषेध करण्यात आला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे-पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन काकडे, छावा क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक गोरख संत, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, गणेश चांदोरे, कुबेर जाधव यांनी केंद्र सरकाराच्या या निर्णयाचे निषेध केला.

Onion
Onion Market : निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर निम्म्याने घसरले

तुषार शिरसाठ, गजानन घोटेकर, कैलास कोकाटे, आपण नवले, रामदास भुजबळ, दिगंबर दौडे, मच्छिंद्र जाधव, ऋषिकेश घोलप, जयेश जगताप, दीपक शिदी, साहिल शेख, सुदाम देशमुख, राजू शिरसाठ, विलास दरगुडे, रवींद्र तळेकर, संजय जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.

एकत्र आंदोलन करणार

केंद्र सरकारविरोधात तीव्र लढा उभरण्यावर एकमत झाले. राज्यातील सर्व शेतकरी संघटना वेगवेगळे आंदोलन न करता एकत्र मोठे शेतकरी आंदोलन उभारले पाहिजे, तसेच लोकसभा आणि विधानसभेवर शेतकरी प्रतिनिधी कसे जातील, याकडे लक्ष देण्याची मागणी उत्तम कदम यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com