Mulberry Registration : नांदेडला ११२० एकरावर तुतीसाठी पूर्वनोंदणी

Mahareshim Abhiyaan : जिल्ह्यात रेशीम कार्यालयाकडून तुती लागवडीसाठी केलेल्या आवाहन प्रतिसाद देत जिल्ह्यातील एक हजार १११ शेतकऱ्यांनी ११२० एकर तुती लागवडीसाठी पूर्व नोंदणी केली आहे.
Mulberry
Mulberry Agrowon
Published on
Updated on

Nanded News : महारेशीम अभियानांतर्गत जिल्ह्यात रेशीम कार्यालयाकडून तुती लागवडीसाठी केलेल्या आवाहन प्रतिसाद देत जिल्ह्यातील एक हजार १११ शेतकऱ्यांनी ११२० एकर तुती लागवडीसाठी पूर्व नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांनी सध्या तुतीची रोपवाटिका तयार करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नृसिंह बावगे यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात तुतीची जुनी लागवड ३१२ एकरावर आहे. तर जून २०२३ मध्ये १५१ एकरावर शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली आहे. दरम्यान जून २०२४ मध्ये लागवड वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने महारेशीम अभियान राबविले होते.

Mulberry
Mulberry Cultivation : तुती लागवडीसाठी ८०१ एकरांवर नोंदणी

यात जिल्ह्यातील एक हजार १११ शेतकऱ्यांनी ११२० एकरासाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडे लागवडपूर्व नोंदणी केली आहे. यात रोजगार हमी योजनेतंर्गत ९२१ एकर तर ९२१ शेतकरी व सिल्क समग्र ०२ योजनेतंर्गत १९० शेतकऱ्यांनी १९९ एकरसाठी नोंदणी केली आहे. या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी रोपवाटीका घेण्यासंदर्भात जिल्ह्यात प्रशिक्षणही झाले आहे.

या शेतकऱ्यांची तुती लागवड जून २०२४ मध्ये होणार आहे. यामुळे या शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा आठवडा किंवा मार्च महिन्याचा पहिला आठवडा या दरम्यान तुती रोप तयार करण्याठी रोपवाटिका करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नृसिंह बावगे यांनी केले आहे. रोपवाटिका बनविताना कोणती काळजी घ्यावी, या संदर्भात शेतकऱ्यांना प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले आहे. असे त्यांनी सांगितले.

Mulberry
Mulberry Nursery Planning : रेशीम उद्योगासाठी तुती रोपवाटिकेचे नियोजन

रेशीमरत्न पुरस्कार देणार

जिल्ह्यात रेशीमचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी रेशीम संचालनालयाकडून यंदापासून रेशीमरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडे किमान एक एकर तुती लागवड असावी, जिल्हा रेशीम कार्यालयात त्यांनी नोंद केलेली असावी, शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा,

कोषातून वर्षाला एक लाखाचे उत्पादन घेतलेले असावे, कोष विक्री केलेली पावती असावी, शासनाच्या निकषाप्रमाणे किटकसंगोपणगृह बांधकाम केलेले असावे, अशा शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयातून अर्ज घ्यावा. यात निवड समितीकडून निवड झालेल्या प्रथम शेतकऱ्यास अकरा हजार, व्दितीय शेतकऱ्यास साडेसात हजार रुपये तर तृतीय क्रमांक येणाऱ्या शेतकऱ्यास पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com