Agrowon Agriculture Exhibition 2024 : रेशीम शेतीसाठी रोपांद्वारे तुती लागवड करावी

Agricultural Exhibition : रेशीम शेती यशस्वी करण्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करून तुती लागवड करण्याची नितांत गरज आहे. भारी जमिनीवर तुती लागवड केली, तर दर्जेदार तुती पाने उपलब्ध होतात.
Tukaram  Mote
Tukaram MoteAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : रेशीम शेती यशस्वी करण्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करून तुती लागवड करण्याची नितांत गरज आहे. भारी जमिनीवर तुती लागवड केली, तर दर्जेदार तुती पाने उपलब्ध होतात. रेशीम शेतीसाठी दृढ इच्छाशक्ती हवी. रेशीम शेतीविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृतीवर भर द्यावा लागेल, असा सूर रेशीम अधिकारी, रेशीम शेतकरी यांनी आळविला.

ॲग्रोवन कृषी प्रदर्शनात गुरुवारी (ता. ११) तुती नर्सरी लागवड या विषयावरील चर्चासत्र पार पडले. या वेळी छत्रपती संभाजीनगर विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, माजी रेशीम उपसंचालक दिलीप हाके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बी. एस. तौर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी डी. डी, डेंगळे, अजय मोहिते (जालना), रेशीम उत्पादक शेतकरी सदाशिव गिते, सिद्धेश्‍वर भानुसे आदी उपस्थित होते.

Tukaram  Mote
Sericulture Industry : शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती उद्योग पर्याय ठरावा

या वेळी बोलताना दिलीप हाके म्हणाले, की मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती वरदान ठरत आहे. महारेशीम अभियानाच्या माध्यमातून एकप्रकारे रेशीम शेतीची पेरणी केली जात आहे. मराठवाड्यामध्ये रेशीम शेतीचा विस्तार करण्यासाठी ॲग्रोवनचे योगदान मोठे आहे. शेतकरी पती- पत्नी जोडीने यशस्वी रेशीम करू शकतात.

Tukaram  Mote
Sericulture Management : रेशीम शेतीत व्यवस्थापन तंत्रातून मिळविले यश

अजय मोहिते म्हणाले, की स्वतः रोपे तयार करून तुती लागवड केली तर खर्च कमी लागतो. तुती रोपावाटिका तयार करण्यासाठी १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी हा योग्य कालावधी आहे. काडीद्वारे लागवड केल्यास तूट येते. रेशीम कोष उत्पादन घेण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. परंतु रोपनिर्मिती करून लागवड केल्यास तीन महिन्यांत कोष उत्पादन घेता येते. तुती रोपवाटिका तयार करून लागवड केली तरच तांत्रिक मान्यता देण्याबाबत विचार सुरू आहे.

सदाशिव गिते म्हणाले, की शेतकऱ्यांनी गटाने एकत्र येऊन, योग्य ज्ञान घेऊन रेशीम शेती सुरू करावी. शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीत नियोजनातून यशस्वी होता येते. सिद्धेश्‍वर भानुसे म्हणाले, की तुती लागवडीसाठी भारी जमिनीची निवड करावी.

रेशीम शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जिद्द व मेहनत करण्याची तयारी हवी. कालिंदा जाधव म्हणाल्या, की कोरडवाहू शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देणे आवश्यक आहे. मूल्यवर्धनाच्या दृष्टीने प्रक्रिया, बाजारपेठेची निवड या बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्या म्हणाल्या. अजय मोहिते यानी तुती नर्सरी लागवड याविषयावर तांत्रिक प्रशिक्षण दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com