Mulberry Nursery Planning : रेशीम उद्योगासाठी तुती रोपवाटिकेचे नियोजन

Sericulture Industry : तुती रोपवाटिकेसाठी सपाट आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. गादी वाफे करताना मातीमध्ये मुरलेले शेणखत मिसळावे. ३ ते ४ महिने वयाची रोपे पाहिजे असतील, तर दोन रोपात १० सेंमी आणि दोन ओळीत २० सेंमी अंतर ठेवावे.
Sericulture Farming
Sericulture FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. संजोग बोकन, धनंजय मोहोड

Sericulture Farming : रेशीम शेती ही शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पूरक व्यवसाय ठरत आहे. रेशीम कीटकाच्या आहारासाठी तुती पाने अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या लागवड आणि व्यवस्थापनही तितकेच महत्त्व आहे. व्यवसायत उतरताना आणि विस्तार करताना नवीन लागवड करण्यासाठी तुतीची रोपवाटिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या वर्षात महाराष्ट्रात १३ लाख ८७२ एकर क्षेत्रावर तुती लागवड झाली आहे.

त्यातही प्रामुख्याने मराठवाड्यात मार्च २०२३ पर्यंत ८,२५१ एकर तुती लागवड व २,०७८ टन कोष उत्पादन झाले आहे. एकंदरीत तुतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, येणाऱ्या काळात तुती रोपांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोपवाटिकेचे नियोजन आणि व्यवस्थापनावरही तितकेच लक्ष दिले पाहिजे.

रोपवाटिका कालावधी

जून ते सप्टेंबर या दरम्यान तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल, अशा प्रकारे रोपवाटिकेचे नियोजन करावे.

ज्यांना डिसेंबर ते जानेवारीमध्ये लागवड करायची आहे. त्यांनी सप्टेंबर महिन्यात रोपवाटिकेची नियोजन करणे गरजेचे आहे.

गादी वाफे निर्मिती

सपाट व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. दोन ते तीन वेळा जमिनीची नांगरट केल्यानंतर शेतातील ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर त्यातील काडी कचरा स्वच्छ करून गादीवाफे तयार करावेत.

गादी वाफे करताना दोन भाग मातीमध्ये मुरलेले शेणखत मिसळावे. ८२ फूट लांब व ४ फूट रुंद आकाराचे चार गादी वाफे करावेत.

३ ते ४ महिने वयाची रोपे पाहिजे असतील, तर दोन रोपात १० सेंमी व दोन ओळींत २० सेंमी अंतर असावे. प्रत्येक बेडभोवती १.५ फूट रुंद पाण्यासाठी सरी करून घ्यावी. एक एकर तुती लागवड पट्टा पद्धतीने ५ × ३ × २ फूट अंतरावर करण्यासाठी ५,५५५ रोपे लागतात

Sericulture Farming
Sericulture : प्रयोगशील शेतीत लाभतेय ‘ती’ ची रेशीम साथ...

रोप काढणी, लागवड नियोजन

गादी वाफ्यावर बेणे लावल्यापासून ३ महिन्यांत रोपांची वाढ ३ फूट होते.

तयार झालेली रोपे लागवडीसाठी गादीवाफ्यावरून काढण्याच्या १ ते २ दिवस अगोदर पाणी द्यावे. त्यामुळे रोपे काढताना मुळांस इजा होणार नाही. रोपांची वाहतूक सकाळी किंवा सायंकाळी करावी.

जमीन नांगरणी करून शेणखत टाकून पट्टा पद्धतीने ५ × ३ × २ किंवा ६ × ३ × २ वर लागवड करावी. बेणे लागवड करण्यापेक्षा

रोपे लावावीत. त्यामुळे १०० टक्के रोपे जगतील.

Sericulture Farming
Sericulture Farming Industry : रेशीम शेती उद्योगात अमर्याद संधी

बागेची वैशिष्ट्ये

तुती लागवड केल्यानंतर १५ वर्षांपर्यंत टिकते. प्रत्येक वर्षी पुनर्लागवड करण्याची गरज नाही.

रोपांची लागवड केल्यापासून ३ ते ४ महिन्यांत तुती पाला रेशीम कीटकास टाकण्यास योग्य होतो. कमी पाण्यात तुती झाडे जगत असल्यामुळे उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसल्यास १ ते २ महिन्यांनी पाणी मिळाल्यास तुती बाग पुन्हा उगवते.

ठिबक सिंचन केल्यास प्रति हेक्टर झाडांची संख्या टिकते. तूट होत नाही.

कीटक संगोपन झाल्यानंतर तुती बागेत उरलेला तसेच कीटकांनी खाऊन उरलेला पाला जनावरांना किंवा गांडूळ खत कंपोस्टसाठी वापरता येतो.

नैसर्गिक आपत्ती जास्त पाऊस किंवा ढगफुटी झाल्यास जास्त नुकसान होत नाही.

तुती बाग व किटक संगोपनासाठी कुटुंबातील व्यक्तींना म्हणजे पुरुष, महिला व वृद्ध अपंग मिळून हेक्टरी १६ लोकांना रोजगार उपलब्ध होतो.

बेणे निवड आणि लागवड

बागायतीसाठी ‘व्ही-१’ व कोरडवाहूसाठी ‘एस-१३’ या तुतीच्या वाणाचे बेणे निवड करावी.

बेणे निवडीसाठी तुतीचे वय ७ ते ८ महिने असणे आवश्यक आहे. बेण्याची जाडी पेन्सिल आकाराची असावी.

शेंड्याकडील कोवळ्या हिरव्या कांड्या बेण्यासाठी वापरू नये. ३ ते ४ डोळे असलेले करड्या रंगाचे बेणे निवडावे. सिकेटरच्या साह्याने डोळ्याच्या वरच्या बाजूने सरळ व तीन डोळ्यांनंतर खालच्या बाजूने थोडा तिरपा काप घ्यावा. २२ ते २५ सेंमी लांबीचे बेणे करताना साल फाटणार नाही, याची काळजी घ्यावी.

तुती बेणे तयार केल्यानंतर लगेच कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून नंतर लगेच गादीवाफ्यावर लागवड करावी.

२ ते ३ दिवसांनी लागवडीसाठी लांब ठिकाणी बेणे लागत असल्यास ओल्या गोणपाटात गुंडाळून वाहतूक करावी. फांद्यांचा गठ्ठा बांधून घेऊन जावा. लागवड करण्याच्या ठिकाणी बेणे तयार करावे.

गादी वाफ्यावर एकच बेणे वापरून दोन डोळे जमिनीत व एक डोळा जमिनीच्यावर राहील, अशी लागवड करावी. लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावे.

रोपवाटिकेस सुपीक काळी जमीन असल्यास ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एक महिन्याच्या अंतराने खुरपणी करून तणनियंत्रण करावे. दोन महिन्यानंतर ५०० ग्रॅम युरिया प्रति गादीवाफ्यास देऊन हलकेसे पाणी द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com