Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Milk Production : शेती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी २००३-०४ मध्ये दोन एचएफ गाईंची खरेदी करून दुग्धव्यवसायाची सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात लहान मोठ्या मिळून ४५ गाई आहेत.
Cow Farming
Cow Farming Agrowon

शेतकरी नियोजन ः गोपालन

शेतकरी ः दगडू मच्छिंद्र लोखंडे

गाव ः बेवणूर, ता. जत, जि. सांगली.

सांगली जिल्ह्यातील बेणवूर (ता. जत) हे दुष्काळी गाव. येथील दगडू मच्छिंद्र लोखंडे यांची वडिलोपार्जित चार एकर शेती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी २००३-०४ मध्ये दोन एचएफ गाईंची खरेदी करून दुग्धव्यवसायाची सुरुवात केली.

आज त्यांच्या गोठ्यात लहान मोठ्या मिळून ४५ गाई आहेत. गाईंसाठी त्यांनी मुक्त संचार पद्धतीचा गोठा उभारला आहे. गोठ्यात गाईंची संख्या मर्यादित ठेवल्याने व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे. काटेकोर व्यवस्थापनातून दुग्धव्यवसायात त्यांनी भरारी घेतली आहे.

दगडू मच्छिंद्र लोखंडे यांचे बीए पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्याचा विचार मनात आला. २००३ मध्ये सांगलीमध्ये ठिबकच्या दुकानात, दवाखाना, मेडिकलमध्ये मार्केटिंग अशी चार वर्षे नोकरी केली. मात्र नोकरीत मन रमले नाही. त्यातच दुष्काळामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते.

Cow Farming
Animal Care : जनावरांतील ताण कमी करण्याचे उपाय

त्यातूनच शेतीला पूरक व्यवसाय केला तर नक्कीच आर्थिक प्रगती होईल, अशी आशा दिसली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे जनावरांचा बाजार भरतो. या ठिकाणी गुणवत्तापूर्ण गाई मिळतात याची माहिती होतीच. २००३-०४ च्या दरम्यान सांगोला बाजारातून दोन एचएफ गाई खरेदी केल्या. त्याच गाईंच्या पाड्या सांभाळून पुढे गाईंची संख्या वाढवत नेली. गोठ्यातील कामांमध्ये पत्नी सौ. कविता यांची दगडू यांना मोलाची मदत मिळते.

व्यवस्थापनातील बाबी ः

- दररोज सकाळी सहा वाजता गोठ्यातील कामांना सुरुवात होते.

- सध्या गोठ्यामध्ये ३२ मोठ्या गाई असून त्यापैकी दुधाळ गाई २८ आहेत.

- गाईंसाठी मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्याची उभारणी केली आहे. गोठ्याचा आकार साधारण ११० फूट बाय १०० फूट इतका आहे.

- गोठ्यामध्ये गाईंसाठी चार कप्पे केले आहेत. त्यातील पहिला कप्प्यात तीन महिन्यापर्यंत, दुसरा कप्प्यात तीन ते अकरा महिने पर्यंत, तिसरा कप्प्यात अकरा महिने ते गाभण होईपर्यंत तर चौथा कप्प्यात दुधाळ गाईंना ठेवले जाते. कप्पे केल्यामुळे गाईंच्या वयानुसार चारा, खाद्य, पाणी यांचे नियोजन करणे अधिक सोपे झाले आहे.

- गोठ्यातील गाईंचे लसीकरण, गाभणकाळ, आरोग्य यांच्या वेळोवेळी नोंदी ठेवल्या जातात.

- ऋतुनिहाय गोठा आणि जनावरांच्या व्यवस्थापनात योग्य ते बदल केले जातात. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते.

- प्रति जनावराला ओला चारा २० ते २५ किलो, तर सुका चारा ५ किलो प्रमाणे दिला जातो. आहार व्यवस्थापनावर अधिक भर दिल्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

- संपूर्ण दूध काढणी मिल्किंग यंत्राद्वारे केली जाते. महिन्याकाठी सुमारे साडे तेरा हजार लिटर दुधाचे उत्पादन मिळते.

- शिवाय गोठ्यातून मिळणाऱ्या शेणखताची विक्री केली जाते. त्याची प्रति ट्रॉली ५ हजार रुपये दराने विक्री होते.

- प्रत्येक गाईला कानाला टॅग लावला आहे. पाडी जन्माला आल्यानंतर तिचे संपूर्ण रेकॉर्ड ठेवले जाते.

Cow Farming
Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

आरोग्य व्यवस्थापन ः

- गाईंच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. वेळापत्रकानुसार पशुवैद्यकांच्या सल्ल्याने नियमित लसीकरण केले जाते.

- तीन महिन्यातून एकदा संपूर्ण गोठा डी व्हर्मिंग केला जातो.

- दर महिन्याला गोठ्याची निर्जंतुकीकरण द्रावणाने स्वच्छता केली जाते. त्यामुळे गाई आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

उन्हाळ्यातील व्यवस्थापन ः

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरावर ताण येतो. या काळात त्यांना स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा करण्यावर भर दिला जातो. शिवाय गोठ्यातील तापमान नियंत्रित कसे राखता येईल यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. उष्णतेमुळे गोठ्याचा पत्रा तापला जातो. त्यासाठी गोठ्याच्या पत्र्यावर उसाचा पाला

टाकला जातो. यामुळे गोठ्यातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते. गोठ्यात थंडावा राहण्यासाठी फॉगरचा वापर करण्यात येतो.

- दगडू लोखंडे, ७४९९६८६६६२

(शब्दांकन ः अभिजित डाके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com