

Palghar News : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपामध्ये पेरणीचे वेध लागले आहेत. बी-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी पाहायला मिळत आहे. काही शेतकरी मागील वर्षीचे भात बियाणे पेरणीसाठी वापरतात.
त्यावर कोणतीही बीज प्रक्रिया करीत नाहीत. त्यामुळे बियाण्यांची उगवण योग्य रीतीने होत नाही. बियाणे पेरणीपूर्वी त्यावर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजीवांचा प्रसार बियांद्वारे होतो. बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तसेच बियाण्याची शेतातील उगवण वाढविण्यासाठी, तसेच जोरदार रोपे येण्यासाठी बियाण्यांवर शेतकऱ्यांनी बियाणे पेरणीपूर्वी जैविक व रासायनिक कीटकनाशक व संवर्धकांची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
बियाण्यांद्वारे आणि जमिनीद्वारे उद्भवणाऱ्या कीड व रोगांपासून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी, उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने गावोगावी जागृतीसाठी कृषी विभाग सातत्याने बीजप्रक्रिया कशी करावी, याची प्रात्यक्षिके घेऊन जागृती करीत आहे, असे कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांनी सांगितले.
अशी करावी प्रक्रिया...
मिठाच्या पाण्याची बीजप्रक्रिया : १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळावे. त्यामध्ये भात बियाणे ओतावे व चांगले ढवळून घ्यावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे बियाणे अलगद वरचेवर काढून घ्यावे. तसेच तळाशी राहिलेले निरोगी बियाणे बाहेर काढून ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत तीन ते चार तास वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया : यामध्ये बियाण्यात राहणाऱ्या, तसेच उगवल्यानंतर पिकाला अपायकारक असणाऱ्या बुरशीच्या नायनाटासाठी बीजप्रक्रिया करतात. यामध्ये थायरम, कॅप्टन, कार्बनडिझम यापैकी एक बुरशीनाशक २.५ ग्रॅम या प्रमाणात एक किलो बियाण्याला पेरणीपूर्वी चोळावे.
जिवाणू संवर्धक बीज प्रक्रिया : पीएसबी (स्फुरद विरघळणारे जिवाणू) हे जिवाणू जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या पिकाला उपलब्ध करून देतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.