Crop Damage
Crop DamageAgrowon

Pre Monsoon Rain : राज्यातील विविध भागांत पूर्वमोसमी पावसाचा जोर

Rain Update : मॉन्सून उंबरठ्यावर आलेला असताना पूर्वमोसमी पावसाने मंगळवारी (ता. ४) राज्यात विविध ठिकाणी हजेरी लावली आहे.
Published on

Pune News : मॉन्सून उंबरठ्यावर आलेला असताना पूर्वमोसमी पावसाने मंगळवारी (ता. ४) राज्यात विविध ठिकाणी हजेरी लावली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर राहिला. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. याशिवाय अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात पुन्हा वादळाचा तडाखा बसून केळी, पपईच्या बागांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, बुधवारी (ता. ५) देखील राज्यात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमधील धानोरा परिसरात तसेच बीड जिल्ह्यातील शिरूरकासार शहरात मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात नांदेड, लोहा, कंधार तालुक्यांत मध्यम पाऊस झाला.

Crop Damage
Pre Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाची पुन्हा दमदार हजेरी

मंगळवारी पुणे जिल्ह्यात वडगावशेरी येथे बुधवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस पडला. इंदापूर, खेड, आंबेगाव तालुक्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. खेडमध्ये तिन्हेवाडी येथे शेतात महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. मंगल रंगनाथ आरडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सातारा, सांगली जिल्ह्यांत पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले. अनेक ओढे-नाले वाहू लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) कडक उन्हात पावसाच्या सरी कोसळल्या.

Crop Damage
Monsoon Update : मॉन्सूनची स्वारी आज महाराष्ट्रात येण्याचे संकेत

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ४६ मंडलांत पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री काही भागांत हलका पाऊस झाला. मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि बार्शी भागामध्ये हलका पाऊस झाला. नगर जिल्ह्यात सोमवारी (ता. ३) रात्री अनेक भागांत चांगला पाऊस झाला. मंगळवारी देखील काही भागांत पाऊस झाला.

अकोल्यातील तेल्हाऱ्याला पुन्हा वादळाचा तडाखा

अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात मंगळवारी (ता. ४) रात्री उशिरा आलेल्या वादळाने मोठे नुकसान झाले. केळी, पपईच्या बागांमध्ये झाडे तुटून पडली. हिंगणी, दाणापूर खुर्द व इतर गावांत हे वादळ घोंघावले. या वाऱ्यासोबत पाऊसही झाला. वादळाने शेकडो एकरांवरील पपई व केळीच्या बागा भुईसपाट केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com