Maharashtra Pre Monsoon Rain : भंडाऱ्यासह सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

Pre Monsoon Rain Update : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी (ता. २८) देखील भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी लावली.
Pre-Monsoon Rains
Pre-Monsoon RainsAgrowon

Pune News : मॉन्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भंडाऱ्याला मंगळवारी (ता. २८) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपले. तसेच सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात देखील सोमवारी आणि मंगळवारी (ता. २८) पावसाने शेतीचे नुकसान केले. यादरम्यान मॉन्सूनपूर्व पावसामुळे प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर खरीपाच्या लागवडीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

राज्याच्या विविध भागात मॉन्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यादरम्यान भंडाऱ्या मंगळवारी (ता. २८) सायंकाळी अचानकपणे झालेल्या पावसामुळे वातारवणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झाले.

Pre-Monsoon Rains
Pre-Monsoon Rains : छ. संभाजीनगरला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; ८ पशूधन दगावले, ३५ कुटुंबाचा संसार आला उघड्यावर

भंडाऱ्यातील नाकाडोंगरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर चिचोली ते नाकाडोंगरी परिसरात येणाऱ्या जंगलव्याप्त भागातील झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली. दरम्यान आचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. येथे रब्बी हंगामातील कापून ठेवलेले धान पिक पुन्हा भीजले. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक जाण्याची शक्यता आहे.

अहमदनगरमध्ये २० पाली घरांचे नुकसान

अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात देखील मॉन्सूनपूर्व पावसाने दणादाण उडवून दिली. येथे खर्डा परिसरातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीत सायंकाळी वादळ व जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे वास्तव्यास असणाऱ्या मदारी समाजातील २० घरांचे नुकसान झाले. पाल उडून गेल्याने संसार उघड्यावर आले.

Pre-Monsoon Rains
Pre-Monsoon Rains : राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह वळवाचा हैदोस, शेतीचे मोठे नुकसान

सोलार पॅनेलचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे रविवारी (ता. २६) आणि सोमवारी (ता.२७) झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. येथे रविवारी झालेल्या वादळी पावसाने सोलार पॅनेलचे नुकसान केले. पांडुरंग दशरथ लोंढे असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी तीनच महिन्यांपुर्वी शासनाच्या कुसुम सौर योजनेमधून विहिरीवर सौर यंत्राची जोडणी केली होती. मात्र वादळी वाऱ्यामुळे सोलार पॅनेलचे नुकसान झाल्याने जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

रत्नागिरीत मे महिन्यात ५३ हजार हेक्टरवचे नुकसान

दरम्यान मे महिन्यातील वळवाच्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. येथे मान्सुनपुर्व पावसाचा ३८० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. १०४ गावातील ५३ हजार हेक्टरवचे शेतीचे नुकसान झाल्याचा जिल्हा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. तसेच खेड तालुक्यातील ३६ गावातील १४२ शेतकऱ्यांचे नुकसन झाले आहे. त्याखालोखाल मंडणगड तालुक्यातील १५ गावातील ५३ बागायतदारांचे नुकसान झाले आहे. खेड तालुक्यात आंबा, काजू, केळी, नारळ आणि फणसाचे सर्वाधिक नुकसानस झाले आहे.

नुकसानीची त्वरित भरपाईची मागणी

यादरम्यान माढ्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी प्रहार शेतकरी संघटनेने तहसीलदारांना निवेदन दिले. यात निवेदनातून रविवारी (ता. २६) आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी घरांवरील पत्रे, जनावरांचा चारा असणाऱ्या गवताच्या गंजी उडून गेल्या आहेत. तसेच केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. उन्हाच्या चटक्याने देखील केळी, पेरू, आंब्यासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com