Pre-Monsoon Rains : छ. संभाजीनगरला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; ८ पशूधन दगावले, ३५ कुटुंबाचा संसार आला उघड्यावर

Chhatrapati Sambhajinagar Rain News : छत्रपती संभाजीनगरला सगल दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. येथे काही ठिकाणी वीज पडल्याने ८ पशूधन दगावले असून अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे.
Pre-Monsoon Rains
Pre-Monsoon RainsAgrowon

Pune News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सगल दोन दिवस वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. शनिवार आणि रविवारी (ता. २६) झालेल्या जोरदार वादळी पावसाने येथे अनेकांचे संसार उघड्यावर आणले. तसेच ८ जनावरांचा मृत्यू वीज पडून झाला. जिल्ह्यात शेतीचे देखील मोठे नुकसान झाले असून नैसर्गिक संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

संसार उघड्यावर

जिल्ह्यात सगल दोन दिवस पडलेल्या पावसामुळे वाढत्या गरमीने हैराण झालेल्या नागरीकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र वादळी वाऱ्याने उभे पीक जमिनदोस्त केले असून फळबागा भूईसपाट झाल्या. जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील टिटवी, पळसखेडा गावांना सोमवारी जोरदार वादळी पावसाने तांडव केला. रविवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसाने शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर आले. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Pre-Monsoon Rains
Pre-Monsoon Rains : राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह वळवाचा हैदोस, शेतीचे मोठे नुकसान

आठ जनावरांचा मृत्यू

मात्र दोन दिवसांमध्ये ३५ कुटुंबाचा संसार उघड्यावर आले आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी वीज पडून आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे. हळदा येथील धनुसिंग कमलसिंग शिमरे यांचे दोन बैल, पिंपळदरी येथील देविदास लोखंडे यांच्या गाईसह वासराचा मृत्यू वीज पडून झाला. तसेच शेखपूर येथील हिरा पालोदे यांच्या गाईसह हळदाशिवरातील प्रभू नथू शेकडे यांच्या गर्भवती गाईचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

Pre-Monsoon Rains
Pre monsoon Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपलं; आंब्याचे नुकसान, भाजीपाला पिकांना दिलासा

शेतकरी हवालदिल

जिल्ह्यातील शिरसाळा, आंभई, उंडणगाव, बहुली, हट्टी, पिंपळदरी बोदवड, शेखपुर, सिल्लोड या गावांना वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. तर खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी खरीप पेरणीच्या कामांना ब्रेक लागला असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

सरकारने मदत करावी

तसेच शेतातील उभे पिकासह संसाराचे नुकसान झाले आहे. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह नागरीकांना सरकारने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com