Prataprao Pawar, President of Sakal Media Group
Prataprao Pawar, President of Sakal Media GroupAgrowon

Global Pride of Maharashtra : प्रतापराव पवार यांना ‘ग्लोबल प्राइड’ सन्मान

Prataprao Pawar : लंडनमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महाराष्ट्र मंडळाकडून देण्यात येणारा ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ हा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना सोमवारी जाहीर करण्यात आला.
Published on

Pune News : लंडनमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महाराष्ट्र मंडळाकडून देण्यात येणारा ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ हा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना सोमवारी जाहीर करण्यात आला.

Prataprao Pawar, President of Sakal Media Group
Agriculture AI : प्रतापराव पवार यांच्याकडून ३.५ कोटींची देणगी

उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्रतापराव पवार यांचा या सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे. ‘‘प्रतापराव पवार यांच्या उद्योगक्षेत्रातील कार्य कर्तृत्वाने कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नवे मानदंड प्रस्थापित करतानाच अगणित मराठीजनांना प्रेरणा दिली आहे,’’

Prataprao Pawar, President of Sakal Media Group
Prataprao Pawar : पिलानीतील मंतरलेले दिवस...!

असे महाराष्ट्र मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. हा सन्मान वितरण सोहळा ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ब्रिटिश संसदेच्या ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये (प्रतिनिधी गृह) दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.

परदेशस्थ मराठी बांधवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र मंडळाची १९३२ मध्ये न. चिं. केळकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने स्थापना करण्यात आली होती. तब्बल ९२ वर्षांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या संस्थेने विविध माध्यमांतून जगभर मराठी संस्कृतीचा प्रचार अन् प्रसार करताना कला, उद्योग आणि क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये मराठी माणसाला काम करता यावे म्हणून त्याच्यामागे मोठे पाठबळ उभे करण्याचे काम केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com