Bachchu Kadu : '...तर अपक्ष किंवा लहान पक्षातील एखादा मुख्यमंत्री ही होऊ शकतो' : बच्चू कडू यांचा दावा

Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील विझानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून एक्झिट पोलमधून सत्ता कोणाची येणार याचे अंदाज देखील समोर आले आहेत.
Bachchu Kadu
Bachchu KaduAgrowon
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आता २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निकालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले असून सत्तेत कोण बसणार याचे चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. यादरम्यान आता प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी राज्यात लहान पक्ष सत्तेत येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच अपक्ष किंवा लहान पक्षातील एखादा मुख्यमंत्री ही होऊ शकतो, असा दावाही केला आहे. यामुळे राज्यात त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.

एकीकडे महायुतीचे नेते राज्यात आपलीच सत्ता येईल असा दावा करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते देखील सत्ता कोणाची येईल ते २३ ला बघाच. आम्ही सत्तेत असू असा दावा करत आहेत. आता असाच दावा आमदार बच्चू कडू यांनी केला असून कडू यांनी, महाराष्ट्रात आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही, असा दावा केला आहे. कडू यांच्या अशा दाव्यावरून सध्या राज्यात चर्चांना उत आला आहे.

Bachchu Kadu
Maharashtra Assembly Election 2024 Voting : राज्यात ६५ टक्के मतदान; सर्वाधिक कोल्हापूर तर सर्वात कमी मुंबईत

यावेळी कडू यांनी, माझ्या मतदारसंघात भाजपने अतिशय खालच्या पातळीवर राजकारण केले. काँग्रेस आणि भाजप हे संभ्रमात असून त्यांच्या डोक्यात फक्त बच्चू कडूला पाडण्याचा विचार आहे. पण आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास कडू यांनी व्यक्त केला आहे.

तसेच राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार असून हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. सत्तेत येण्यासाठी एखाद्या मोठ्या पक्षाला आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. आमच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असा दावा कडू यांनी केला आहे.

Bachchu Kadu
Kolhapur Assembly Election : कोल्हापूर राज्यात भारी; विधानसभा निवडणुकीत उच्चांकी ७६.१७ टक्के मतदान

तर राज्यातील मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती असो किंवा महाविकास आघाडी त्यांना सत्ता स्थापनेसाठी अपक्ष व इतर लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची असेल. यामुळे आता लहान पक्ष आणि अपक्षांना मोठा वाटा मिळू शकतो. अपक्ष किंवा लहान पक्षातील उमेदवार मुख्यमंत्रीही होऊ शकतो, अशी शक्यता असल्याचेही कडू यांनी म्हटले आहे.

भाजप कारवाई मागे घेणार?

दरम्यान एक्झिट पोलच्या अंदाजानंतर आता भाजप ॲक्शन मोडवर आली असून भाजपने पक्षातील बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधणार आहे. भाजप विजय बंडखोरांविरोधातील कारवाई मागे घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचा बंडखोरांशी संपर्क

अशीच तयारी काँग्रेसकडून देखील केली जात असून सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने बंडखोरांशी संपर्क साधला आहे. जे बंडखोर विजयी होण्याची शक्यता आहे. त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर काँग्रेस नेते सक्रिय झाले असून गाठीभेटींसह चर्चा करण्यावर भर दिला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com