Exit Poll Results : महाराष्ट्रासह झारखंडमध्ये भाजप युतीचा विजय; एक्झिट पोलमधून बहुमताचा अंदाज

Maharashtra Exit Polls Result 2024 : महाराष्ट्रासह झारखंडमध्ये बुधवारी (ता.२०) विधानसभेचे मतदान पार पडले. यानंतर विविध सर्वेक्षणांमध्ये दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील आघाडीला बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Exit Polls Result 2024
Maharashtra Exit Polls Result 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी (ता.२०) संपन्न झाली.राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असून झारखंडमध्ये दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ३८ जागांसाठी ६८. ४५ टक्के मतदान झाले. यानंतर अनेकांच्या नजरा एक्झिट पोलच्या अंदाजाकडे लागल्या होत्या. आता एक्झिट पोलच्या अंदाजसमोर आला असून विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रासह झारखंडमध्ये भाजपला मतदारांनी पसंती दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह झारखंडमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यानंतर अखेर राज्यात एका टप्प्यात आणि झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (Exit Polls) निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासह झारखंडमध्ये कोणाची सत्ता येणार? याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तर एक्झिट पोलच्या कलानुसार महाराष्ट्रासह झारखंडमध्ये भाजपला मतदारांनी पसंती दिली असून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो.

Maharashtra Exit Polls Result 2024
Maharashtra Assembly Election 2024 Voting : राज्यात ६५ टक्के मतदान; सर्वाधिक कोल्हापूर तर सर्वात कमी मुंबईत

यामुळे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊ शकते. तर आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर भाजप अॅक्शनमोडमध्ये आली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.मात्र, ॲक्सिस माय इंडियाने झारखंडमध्ये भारतातील आघाडी सरकार परत येण्याची शक्यता वर्तवली आहे. आता मतदार कोणाला संधी देणार हे दोन्ही राज्यांतील मतमोजणीनंतरच (२३ नोव्हेंबर) सिद्ध होणार आहे.(Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024)

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीला पसंती!

महाराष्ट्रात चाणक्यच्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला १५२ ते १६०, काँग्रेस आघाडीच्या महाविकास आघाडीला १३० ते १३८ आणि इतरांना ६ ते ८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.भास्करच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला १२५ ते १४०, मविआला १३५ ते १५० आणि इतरांना २० ते २५ जागा मिळतील. तसेच लोकशाही मराठी-रूद्रच्या सर्वेक्षणात महायुतीला १२८ ते १४२, मविआला १२५ ते १४० आणि इतरांना १८ ते २३ जागा मिळतील.

Maharashtra Exit Polls Result 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात लोकशाहीचा लोकोत्सव, ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान; अनेक ठिकाणी मशीनमध्ये बिघाड

मॅट्रीसच्या सर्वेक्षणात महायुतीला १५० ते १७०, काँग्रेस आघाडीच्या महाविकास आघाडीला ११० ते १३० आणि इतरांना ८ ते १० जागा मिळण्याचा अंदाज आहे.१३७ ते १५७ जागा मिळवून महायुती महाराष्ट्रात सत्ता राखू शकते असा अंदाज पी-मार्कच्या एक्झिट पोलचा असून मविआस १२६ ते १४६ जागा मिळू शकतात. तर इतरांना २ ते ८ जागांवर समाधान मानावे लागेल. पीपल्स प्लसच्या मते, १७५ ते १९५ जागा महायुतीस, मविआला- ८५ ते ११२ आणि इतरांना ७ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्यानुसार महायुती १२२ ते १८६, मविआला ६९ ते १२१ आणि इतर १० ते २७ जागा मिळतील. टाइम्स नाऊ प्रमाणे १५० ते १६७ जागा महायुती, मविआला १०७ ते १२५ आणि अन्य १३ ते १४ जागा जिंकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

झारखंडमध्ये कोणाची सत्ता?

दरम्यान झारखंडमधील विधानसभेच्या ८१ जागांपैकी ३८ जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले.याआधी पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला राज्यातील ४३ जागांसाठी मतदान झाले होते. येथे देखील निवडणुका संपल्यानंतर एक्झिट पोलने आकडेवारी जाहीर केली आहे. येथे सहा पैकी चार एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. झारखंडमध्ये एनडीएला ४४ ते ५३ जागा आणि इंडिया अलायन्सला २५ ते ३७ जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

Maharashtra Exit Polls Result 2024
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के, झारखंडमध्ये १२.७१ टक्के मतदान

झारखंडमध्ये मॅट्रीसच्या सर्वेक्षणात भाजपला ४२ ते ४७ इंडिया आघाडीच्या झामुमोला २५ ते ३० आणि अन्य १ ते ४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचबरोबर पीपुल्सच्या पोलनुसार भाजपला ४४ ते ५३, इंडिया आघाडीला २५ ते ३७ आणि इतरांना ५ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. चाणक्यच्या सर्वेक्षणातही भाजपला ४५ प्लस जागा मिळतील असा अंदा वर्तवण्यात आला असून येथे भाजप ४५ ते ५०, इंडिया आघाडी ३५ ते ३८ आणि अन्य ३ ते ५ जागांवर असतील असे म्हटले आहे.

पी-एमएआरक्यूच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला ३७ ते ४७ अन्य १ ते ७ आणि भाजपला ३१ ते ४० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणात झारखंडमध्ये भाजपला झटका बसेल असा अंदाज वर्तवला आहे. तर एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजप २५ इंडिया आघाडी ५३ आणि इतर ३ जागांवर असून या पोलमध्ये देखील इंडिया आघाडी सत्तेत असा अंदाज सांगितला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com