Electric Tractor: इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे जीवन बदलून टाकेल; मंत्री सरनाईकांचा दावा

Green Farming: इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे बदलेल आणि देशातील शेती क्षेत्रात एक नवीन क्रांती येईल, असा दावा राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला.
Electric Tractor
Electric TractorAgrowon
Published on
Updated on

Thane News: इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे बदलेल आणि देशातील शेती क्षेत्रात एक नवीन क्रांती येईल, असा दावा राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या नोंदणीच्या कार्यक्रमात सोमवारी (ता.३०) बोलत होते. 

सरनाईक यांनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे खर्चात बचत होईल, असंही सांगितलं. "इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे शेतीचा खर्च खूप कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत ६० ते ७० टक्के कमी खर्चात काम करतं." सरनाईक म्हणाले.

Electric Tractor
Agriculture Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जरूर आणा, पण...

पुढे बोलताना सरनाईक म्हणाले, "उदाहरणार्थ, डिझेल ट्रॅक्टरने एक एकर शेत नांगरण्यासाठी १२०० ते १५०० रुपये लागतात, तर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने याच कामासाठी फक्त ३०० रुपये लागतात. यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या प्रत्येक कामात मोठी बचत होईल. कमी खर्चामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नातून जास्त नफा मिळवता येईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल." असंही सरनाईक यांनी सांगितलं.

Electric Tractor
Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या मागणीत मोठी वाढ? काय आहे नेमकं कारण?

महाराष्ट्र सरकारच्या २०२५ च्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना १.५ लाख रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जही मिळेल. हे कर्ज आणि सूट मिळाल्याने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करणे खूप सोपे होईल.

विशेषतः छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप उपयुक्त ठरेल, कारण त्यांना आर्थिकदृष्ट्या नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे शक्य होईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली. इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे शेती करणे केवळ स्वस्तच नाही, तर पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे. डिझेल ट्रॅक्टरमुळे होणारे प्रदूषण इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमुळे होत नाही. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल आणि शेतकरी हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात आपले योगदान देऊ शकतील.

सरनाईक यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक जीवन सुधारेल आणि देशातील शेती क्षेत्रात एक नवीन युग सुरू होईल.शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर करून आपली शेती अधिक यशस्वी आणि फायदेशीर करावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपले भविष्य उज्ज्वल करू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com