Mango Orchard Management : अतिघन आंबा बागेत करावयाची कामे

Mango Farming : गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वादळी वारे व मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने बागायतदारांची तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे विविध टप्प्यांवर असलेले आंबे मोठ्या प्रमाणात गळाल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झालेले आहे.
Mango Farming
Mango FarmingAgrowon
Published on
Updated on

Mango Crop Management : गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वादळी वारे व मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने बागायतदारांची तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे विविध टप्प्यांवर असलेले आंबे मोठ्या प्रमाणात गळाल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झालेले आहे. बागेत खाली गळून पडलेले आंबे आणि बरेच दिवस राहिलेल्या पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.

पावसाळी वातावरणामुळे आंबा काढणीलाही उशीर होत आहे. तसेच अशा पावसाळी वातावरणामध्ये आंब्याची मागणी व दरही काही प्रमाणात कमी झाल्याने ज्यांची काढणी अंतिम टप्प्यात आहे, अशा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती.

बहुतेक शेतकऱ्याची आंबा काढणी पूर्ण झालेली असेल. काढणी बाकी असल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावी. गेल्या काही दिवसांत पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. त्यामुळे दरामध्ये काही प्रमाणात पुन्हा वाढ होत आहे.

बऱ्याच बागांमध्ये रिकाम्या फुटीवर नवीन नवतीसुद्धा आलेली दिसत आहे. अशा नवतीमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यावर लक्ष ठेवावे. बागेत खाली पडलेली आंबा फळे व्यवस्थित गोळा करून त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी. अन्यथा त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होईल.

Mango Farming
Kesar Mango Farming: केसर आंबा बागेत व्यवस्थापनावर भर

फळमाशी नियंत्रणासाठी विद्यापीठाद्वारे शिफारशीत रक्षक सापळे एकरी सहा ते सात या प्रमाणात बागेमध्ये लावून घ्यावेत. या वर्षी फळ काढण्यास थोडा उशीरच झालेला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीची फळधारणाही उशिरा होऊ शकते.

पावसाला बऱ्यापैकी उघडीप पडलेली असल्याने आपल्या बागेतील साफसफाईची कामे पूर्ण करून घ्यावीत. विशेषतः जुन्या फळाचे राहिलेले देठ काढून घ्यावेत. झाडावरील सुकलेल्या फांद्या, वाळलेली पाने इत्यादी सुद्धा काढून घ्यावी. अति घन लागवड बागेत हलकीशी छाटणी करून दोन ओळी एकमेकांना मिळणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच छोटा ट्रॅक्टर सहजपणे चालू शकेल, हे पाहावे.

Mango Farming
Mango Orchard Farming: आंबा बागेतून शाश्‍वत उत्पन्नाचा आधार

छाटणीनंतर बागेमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी) तीन ग्रॅम अधिक क्लोरपायरिफॉस तीन मि.लि. प्रति लिटर पाणी या याप्रमाणे फवारणी करावी. फवारणीवेळी पाने, खोड, फांद्यांही व्यवस्थित ओल्या होतील, हे पाहावे. खोड व फांद्यांना जिथे जिथे डिंक आलेला आहे, तो व्यवस्थित खरडून घ्यावा. त्या जागी जखम झालेली असल्यास तिथे बोर्डो पेस्ट लावून घ्यावी.

ही छाटणी व त्यानंतरची कामे १५ ते २० मेच्या दरम्यान होणे आवश्यक असते. त्यानंतर १५ जूनपर्यंत झाडावर मोठ्या प्रमाणात नवीन नवती येते. मात्र या वर्षी काढणीला उशीर झालेला असल्याने शेतकऱ्यांना ही कामे करण्यास वेळ मिळालेला नाही. त्यामुळे नवती येऊन ती पक्व होणे यात काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे पुढील फळहंगाम उशीर सुरू होण्याची शक्यता वाढलेली आहे.\

नवती आलेली असल्यास ती पक्व होण्यासाठी ०ः५२ः३४ या विद्राव्य खतांची ७ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. शिफारशीप्रमाणे शेणखत व रासायनिक खताच्या मात्रा द्याव्यात.

डॉ. भगवानराव कापसे ९४२२२९३४१९

(लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com