Raju Shetti News : उसाला प्रतिटन पहिली उचल एकरकमी ३३०० रुपये द्या : शेट्टी

Sugarcane FRP : या वर्षी उसाला प्रतिटन एकरकमी ३३०० रुपये पहिली उचल कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
Raju shetti
Raju shettiAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : या वर्षी उसाला प्रतिटन एकरकमी ३३०० रुपये पहिली उचल कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ताडकळस (ता. पूर्णा) येथे मंगळवारी (ता. १०) रात्री आयोजित ऊस सोयाबीन व कापूस परिषदेत ते बोलत होते. माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले, माजी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे उपस्थित होते.

Raju shetti
Raju Shetti vs Prakash Awade : राजू शेट्टी अन् साखर कारखानदारांमधील संघर्ष अटळ? आमदार प्रकाश आवाडेंनी दिलं आव्हान

शेट्टी म्हणाले, की मागील हंगामातील उसाला तीनशे रुपये एफआरपी सोडून ज्यादा देण्यात यावेत. सोयाबीनला ९००० रुपये व कापसाला १२३०० रुपये दर स्थिर ठेवण्यात यावा. अन्यथा, लोकप्रतिनिधींना मतदार संघात फिरू देणार नाही.

चालू वर्षातील सोयाबीनवर पडलेल्या ‘येलो मोझॅक’चा पीकविम्याच्या नुकसान भरपाईत समावेश करून नैसर्गिक आपत्ती घोषित करावी. २५ टक्के अग्रिम पीकविमा रक्कम तत्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी.

Raju shetti
Yellow Mosaic : ‘सोयाबीनवरील ‘येलो मोझॅक’ला नैसर्गिक आपत्ती मानून मदत द्या’ : राजू शेट्टी

मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्यात यावी. केंद्र शासनाचे आयात-निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या ऊस सोयाबीन व कापूस या पिकांचे भाव पडण्यास कारणीभूत आहे. केंद्र सरकारने उद्योगपतींच्या हितासाठी पाम तेल आणि कापसाच्या गाठी आयात करून ऐन पिकाच्या हंगामामध्ये सोयाबीन व कापसाचे भाव पाडले. जीएम सीड्सच्या लागवडीसाठी परवानगी देण्याची मागणी ही या वेळी केली.

रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, पंडितअण्णा भोसले, रामा दुधाटे, नवनाथ दुधाटे, विष्णू दुधाटे, माउली शिंदे, उद्धवराव जवंजाळ, निर्वल काका, नामदेव काळे, विठ्ठल चोखट, विकास भोपाळे, गजानन दुगाने, प्रसाद गरुड, निवृत्ती गरुड, माउली लोडे, मोकिंद वावरे, अंकुश शिंदे, मयूर वाघमारे, आदी लावांदे, विश्‍वजित जोगदंड, रामभाऊ आवरगंड, बाळासाहेब घाटोळ आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com