Marathwada Water Crisis : मराठवाड्यात यंदा रब्बीची वाट अवघड ; २४ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Lack of Rain Has Affected Marathwada : यंदा अपेक्षित पाऊस न पडलेल्याने रब्बी पिकाच्या पेरणीसोबतच मराठवाड्यातील फळबागांवर संकटाची पुन्हा एकदा कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

Marathwada News : अपेक्षित न पडलेला पाऊस, जलसाठ्यांची दयनीय अवस्था, उपशावर असलेले विहिरी व बोरवेल यामुळे मराठवाड्यातील यंदाच्या रब्बीची वाट अवघडच आहे.

अजूनही शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची कृपा होण्याची अपेक्षा आहे. परंतु ती अपेक्षापूर्ती न झाल्यास रब्बी पिकाच्या पेरणीसोबतच मराठवाड्यातील फळबागांवर संकटाची पुन्हा एकदा कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.

Rabi Season
Milk Rate : गायीचा दूध खरेदी दर पूर्ववत करा, अन्यथा पुरवठा रोखू ; अरुण डोंगळे यांचा इशारा

यंदा मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर व लातूर या दोन्ही कृषी विभागांत नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत सरासरी ८३.३७ टक्के पाऊस झाला.

दुसरीकडे लातूर कृषी विभागात पाच जिल्ह्यांत सरासरी ८२.१९ टक्के पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ९०.१३ टक्के, जालना ८०.६० टक्के, बीड ७९.३९ टक्के, लातूर ७५ टक्के, धाराशिव ७३ टक्के, नांदेड १०७ टक्के, परभणी ६७ टक्के तर हिंगोली जिल्ह्यात ९२ टक्के पाऊस झाला.

परतीच्या पावसाची थोडी कृपा झाल्याचे काही भागांत दिसत असले तरी जमिनीचे पोटच भरले नाही. त्यामुळे अजून सोयाबीन काढण्याची लगबग सुरू असतानाच जमिनीतील ओल तुटल्यात जमा आहे. दुसरीकडे काही भागांचा अपवाद वगळता बहुतांश भागातील विहिरी उपशावर आल्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कृषी विस्तार व संशोधन सल्लागार समितीच्या बैठकीत फळबाग तज्ज्ञांनी पाण्याची उपलब्धता पाहता फळबागा वाचविण्याची संकट आपल्यापुढे उभे राहील त्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते.

Rabi Season
Yellow Mosaic : ‘सोयाबीनवरील ‘येलो मोझॅक’ला नैसर्गिक आपत्ती मानून मदत द्या’ : राजू शेट्टी

लातूर कृषी विभागात पाच जिल्ह्यांत तीन लाख ४० हजार ४७५ क्विंटल ज्वारी, गहू, हरभरा, मका, करडई, सूर्यफूल, जवस, तीळ या पिकाच्या बियाण्यांची गरज आहे. तसे नियोजन कृषीच्या यंत्रणेने केले असले तरी अद्याप बियाण्यांची विक्रीच झाली नाही.

लातूरच्या यंत्रणेकडून ५ लाख ३७ हजार ७५० टन खतांची मागणी करण्यात आली आहे. त्या तुलनेत ३ लाख ४५ हजार टन खतांचे आवंटन मंजूर असून १०४७ टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. पाचही जिल्ह्यात दोन लाख २९ हजार ८२७ टन खत शिल्लक आहे.

२४ लाख ४६ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

यंदाच्या रब्बी हंगामासाठी कृषीच्या यंत्रणेकडून २४ लाख ४६ हजार २५६ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. गतवर्षी प्रत्यक्षात २५ लाख ५८ हजार ५३ हेक्टरवर पेरणी झाली होती. सर्व जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली होती.

म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात यंदा १ लाख ११ हजार ७९७ हेक्टरने रब्बीचे कमी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. कृषीच्या यंत्रणेने पावसाअभावी यंदाच्या रब्बीचा हा अंदाज दिला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील तीनही जिल्ह्यांत रब्बी क्षेत्रात जवळपास सहा टक्के घट होण्याची शक्यता कृषीचे यंत्रणेने वर्तवली आहे.

खरिपाचे मुख्य पीक सोयाबीन जवळपास ६० टक्के हातचे गेले. वाळल्यावर पाऊस पडला त्याचा काय उपयोग. आमच्या शिवारातील दिपेवडगाव, पळसखेडा, बोरी सावरगाव, बनसारोळा, होळ, कानडी आदी गावशिवारांतील विहिरी व बोअरवेल यांनी तळ गाठला आहे. अजून पाऊस येण्याची आशा आहे. तो आला तरच रब्बीची किमान पेरणी होईल. अन्यथा पाण्याची उपलब्धता पाहूनच आम्ही पेरणी करू.
- शंकर गूळभिले, दिपेवडगाव, ता. केज, जि. बीड

रब्बीचे सरासरी व प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा ........ सरासरी.... प्रस्तावित

छ. संभाजीनगर... १६९३९३... १६९५७१

जालना.... २०४०३०... १९९२४४

बीड... ३२५८३७... ३८१९०२

लातूर... २८०४३७....३५२९५०

धाराशिव... ४१११७२....४९०७०३

नांदेड... २२४६३४.... ३६६९२५

परभणी... २७०७९५.... २८७२००

हिंगोली... १७६८९३.... १७९४३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com