
Parbhani News : उन्हाचा चटका वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. उपसा तसेच सिंचन आवर्तनामुळे परभणी जिल्ह्यातील लघू तसेच मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात घट होत आहे. गुरुवारी (ता. २७) दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी २६.९७९ दलघमीनुसार ५२ टक्के, तर २२ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी १३.३९१ दलघमीनुसार ३२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. चिंचोली आणि केहाळ (ता. जिंतूर) या २ लघू तलावातील जलसाठा जोत्याखाली गेला आहे.
२०२४ च्या पावसाळ्यात पाणलोटात झालेल्या जोरदार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील लघू सिंचन प्रकल्पात सरासरी ४२.२०५ दलघमीपैकी ३६.०५४ दलघमीनुसार ८५ टक्के जलसाठा होता. एकूण १७ लघू सिंचन प्रकल्प आणि करपरा व मासोळी या दोन मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. जायकवाडी पाटबंधारे विभाग अंतर्गत परभणी जिल्ह्यातील २१ व जालना जिल्ह्यातील लघू सिंचन प्रकल्पांची पूर्ण जल क्षमता सरासरी ४५.८२७ दलघमी, तर उपयुक्त जलसाठा क्षमता ४२.२०५ दलघमी आहे.
गुरुवारी (ता. २७) घेण्यात आलेल्या पाणीपातळीच्या नोंदीनुसार २२ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी १३.३९१ दलघमीनुसार ३२ टक्के जलसाठा होता. देवगाव लघू प्रकल्पामध्ये १८ टक्के, जोगवाडा लघू प्रकल्पामध्ये ४ टक्के, बेलखेडा लघू प्रकल्पामध्ये १३ टक्के, वडाळी लघू प्रकल्पामध्ये ४९ टक्के, चारठाणा लघू प्रकल्पामध्ये १६ टक्के, आडगाव लघू प्रकल्पामध्ये १४ टक्के, भोसी लघू प्रकल्पामध्ये ३६ टक्के, कवड लघू प्रकल्पामध्ये २३ टक्के, मांडवी लघू प्रकल्पामध्ये २१ टक्के, दहेगाव लघू प्रकल्पामध्ये ३७ टक्के, पाडाळी (जि. जालना) लघू प्रकल्पामध्ये ४८ टक्के पाणीसाठा होता.
पेडगाव (ता. परभणी) लघू प्रकल्पामध्ये २६ टक्के, आंबेगाव (ता. मानवत) लघू प्रकल्पामघ्ये १२ टक्के, झरी (ता. पाथरी) लघू तलावामध्ये ९८ टक्के, नखातवाडी (ता. सोनपेठ) लघू प्रकल्पांमध्ये २३ टक्के, तांदूळवाडी लघू प्रकल्पांमध्ये २८ टक्के, राणीसावरगाव लघू प्रकल्पामध्ये ४५ टक्के, टाकळगाव लघू प्रकल्पांमध्ये १४ टक्के, कोद्री (ता. गंगाखेड) लघू प्रकल्पामध्ये १७ टक्के पिंपळदरी लघू प्रकल्पांमध्ये ६६ टक्के जलसाठा आहे.
मध्यम प्रकल्पात ५२ टक्के पाणीसाठा...
करपरा मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता २८.८२० दलमघी असून त्यापैकी उपयुक्त साठा क्षमता २४.९०० दलघमी आहे. मासोळी मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता ३४.०८५ दलघमी असून त्यापैकी उपयुक्त साठा २७.१४१ दलघमी आहे.
जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे गुरुवारी (ता. २७) घेतलेल्या नोंदीनुसार करपरा प्रकल्पात १२.०८३ दलघमी म्हणजेच ४९ टक्के तर मासोळी धरणामध्ये १४.८९६ दलघमी म्हणजेच ५५ टक्के उपयुक्त जलसाठा होता. दोन्ही मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी २६.९७९ दलघमीनुसार ५२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षी २०२४ मध्ये २७ फेब्रुवारी रोजी करपरा मध्यम प्रकल्पांत २.८१८ दलघमी (११ टक्के) तर मासोळी मध्यम प्रकल्पात ०.१९ दलघमी (० टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.