
Haryana News : किमान आधारभूत किंमत (MSP) हमी सुरक्षित करणे आणि कृषी बाजारावरील कॉर्पोरेट नियंत्रणास विरोध यासह प्रमुख मागण्यांसाठी शंभू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून दिल्लीकडे कूच करणाऱ्या १०१ शेतकऱ्यांचा ‘जथ्या’ला हरियाना पोलिसांनी अडवले. या वेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या यात १७ शेतकरी जखमी झाले होते.
त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले असून सोमवारी (ता. १६) नियोजित ट्रॅक्टर मोर्चा काढला. तसेच बुधवारी (ता. १८) ‘रेले रोको’ करण्यात येणार असून त्यात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर यांनी केले आहे.
दरम्यान, हरियानाचे मंत्री अनिल विज यांनी शेतकऱ्यांनी गाड्या अडवण्यापेक्षा आंदोलनाचा पर्यायी मार्ग शोधण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, की प्रशासनाच्या परवानगीनंतर प्रत्येक संघटना आंदोलन करू शकते. शेतकऱ्यांनी गाड्या अडवू नयेत कारण त्यामुळे अनेकांची गैरसोय होईल. त्यांनी आंदोलन करण्याचा दुसरा मार्ग शोधावा.
तत्पूर्वी, शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी पोलिसांच्या कृतीचा निषेध केला आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी जास्त बळाचा वापर केल्याचा आरोप केला. निषेध आंदोलनात नियोजित करण्यात आल्याप्रमाणे सोमवारी पंजाबच्या बाहेर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांनी बुधवारी (ता. १८) पंजाबमध्ये दुपारी १२ ते ३ या वेळेत मोठ्या प्रमाणात ‘रेले रोको’ करण्यात यईल, असे त्यांनी सांगितले.
संयुक्त किसान मोर्चाला आवाहन
पंजाबचे शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी रविवारी (ता. १५) संयुक्त किसान मोर्चाला (SKM) पंजाब-हरियाना सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याबाबत आवाहन केले. संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केंद्रावर दबाव आणत ‘संयुक्त लढा’उभारण्यासाठी एकजुटीचे आवाहन केल्यानंतर पंढेर यांनी हे आवाहन केले.
शंभू सीमेवर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना पंढेर म्हणाले, ‘‘जे बांधव दिल्ली आंदोलन-२ मध्ये (दिल्ली चलो मोर्चा) सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आम्ही हात पुढे केला आहे. शेतकरी आणि कामगारांचे हित लक्षात घेऊन आम्ही त्यांना (संघटनांमध्ये) जे काही मतभेद आहेत ते विसरून जाण्यास सांगितले. आम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक संदेशाची अपेक्षा आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.