Paddy Crop : माणगावमध्ये भातपीक घटले

Paddy Production : माणगाव तालुक्यातील शेवटच्या शेतीपर्यंत पाणी पोहचत नसल्याने उन्हाळी रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र कमी होऊन भातपीक धोक्यात येत आहे.
Paddy Crop
Paddy CropAgrowon

Mangoan News : मात्र, गेल्‍या काही महिन्‍यांपासून डोळवहाळ बंदाऱ्यातील कालव्‍याच्‍या दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तर स्‍थानिक प्रशासनालादेखील या कालव्याची साफसफाई करण्यासाठी पुरेशी यंत्रसामग्री मिळत नसल्याने माणगाव तालुक्यातील शेवटच्या शेतीपर्यंत पाणी पोहचत नसल्याने उन्हाळी रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र कमी होऊन भातपीक धोक्यात येत आहे. शिवाय त्‍यामुळे तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर चाऱ्याचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे. तर काही तालुक्‍यांत सिंचनाची सुविधा असल्‍याने भातशेती बहरत आहेत.

Paddy Crop
Paddy Seeds : ‘रत्नागिरी-८’ भाताचे दीडशे टन बियाणे उपलब्ध

रब्बीतील शाश्वत पीक म्हणून भाताकडे पाहिले जाते. मात्र, यंदा काळ प्रकल्पाच्या कालव्यात मुदतीत पाणी न सोडल्याने माणगावला भाताचे कोठार म्हणून असलेली ओळख यंदाच्या वर्षी पुसट होत आहे. दिवसेंदिवस रब्बी हंगामातील भातपिकाचे क्षेत्र घटत आहे. ही रायगड जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. यंदाच्‍या वर्षी १२० हेक्टरवर भातलागवड करण्यात आली आहे.

माणगाव तालुक्यातील उन्हाळी हंगामातील हजारो हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकाच्‍या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यंदा भातपिकाच्या उत्पादनावर चांगलीच संक्रांत कोपली आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील भातपिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटल्याने शेतकऱ्यांमधून कमालीची चिंता व्यक्त होत आहे. मात्र कडधान्यांच्‍या पीकाने शेतकऱ्यांना हात दिला आहे. यावर्षी १,३५० हेक्टरवर कडधान्ये लावण्यात आली आहे. त्‍यामुळे कडधान्‍यांच्‍या पीकामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

Paddy Crop
Paddy Crop: भात पिकासाठी बारदानेची तयारी जोरात

कडधान्य हेक्‍टर

वाल ७००

मूग ३५०

हरभरा २००

मटकी १००

यंदा कडधान्‍याच्‍या पिकाला प्राधान्य

यंदाच्‍या वर्षी माणगाव तालुक्यात भातपिकाची लागवड १२० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. यंदा भाताचे क्षेत्र कमी झाले असले तरी कडधान्याच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. चवळी, वाल, मूग, त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी तूर, उडीद, हरभरा, भुईमूग, तीळ तसेच भाजीपाल्‍याची लागवड केली आहे. तसेच शेती व्यावसायाला पूरक नगदी पीक म्हणून कलिंगड मोठ्या प्रमाणात पिकवले जात आहेत. मात्र, माणगावची भाताची ओळख पुसट होत असली तरी कडधान्यांमुळे दिलासा मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com