Paddy Seeds : ‘रत्नागिरी-८’ भाताचे दीडशे टन बियाणे उपलब्ध

Rice Research Center : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव (ता. रत्नागिरी) भात संशोधन केंद्राने विकसित केलेल्या रत्नागिरी-८ या भात बियाण्याला कोकणातील शेतकऱ्यांकडून पहिली पसंती मिळत आहे.
Paddy Seeds
Paddy Seeds Agrowon

Ratnagiri News : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव (ता. रत्नागिरी) भात संशोधन केंद्राने विकसित केलेल्या रत्नागिरी-८ या भात बियाण्याला कोकणातील शेतकऱ्यांकडून पहिली पसंती मिळत आहे. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने १५० टन भात बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

Paddy Seeds
Paddy Seed Conservation : पारंपरिक भाताच्या ६५० वाणांचं संवर्धन करणारा 'सीडिंग सत्या'

रत्नागिरी-८ ही जात २०१९ मध्ये अधिघोषित झाली आहे. १३५-१४० दिवसांत तयार होणारी जात असून त्याचा दाणा मध्यम बारीक आहे. चवीला उत्तम असून कापणी वेळेवर केली तर अखंड तांदूळ जास्त होतो. तांदूळ तुटीचे प्रमाणही खूपच कमी आहे. मध्यम उंचीची असल्यामुळे लोळत नाही. करपा किंवा कडा करपा रोगास प्रतिकारक असून वेळेवर पेरणी व लावणी केल्यास किडीला कमी बळी पडते.

आजकालच्या बदलत्या हवामानामुळे योग्य असणारी ही जात आहे. उशिरा पडणाऱ्या (गणपती उत्सवा दरम्यान) पावसाचा फटका बसत नाही. गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा अनुभव खूपच चांगला आहे. २०२२ खरीप हंगामामध्ये या जातीचे ३५ टन बियाणे रत्नागिरी व फोंडाघाट या दोन केंद्रांवरून दोन जिल्ह्यांमध्ये विक्री करण्यात आले होते.

Paddy Seeds
Paddy Seed Bank : ६५० पारंपरिक भात वाणांची 'सीड बँक' करणारा अवलिया

ही जात कोकणापुरती न राहता भारतातील सहा राज्यांमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांसाठी राष्ट्रीय पातळीवरून शिफारस केली आहे

मध्यम-बारीक दाण्याची जात असून १००० दाण्यांचे वजन १६-१७ ग्रॅम एवढे आहे. या जातीचे विद्यापीठस्तरावर सरासरी उत्पन्न ५५-६० क्विंटल प्रतिहेक्टर आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही शेतकऱ्यांनी ८५-९० क्विंटल प्रतिहेक्टर एवढे उत्पन्न घेतले आहे. गेली दोन वर्षे बियाण्याची मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर बियाणे निर्माण केले आहे.
डॉ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, शिरगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com