Market Bulletin : सोयाबीनच्या भावात दोन दिवसांमध्ये क्विंटलमागं काही बाजारात ५० ते ७० रुपयांपर्यंत वाढ झाली होती. बाजारातील मर्यादीत होणारी आवक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाला असेलली मागणी यामुळे सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून येत आहे.
सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर आंतराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. सोयाबीनच्या बाजारात चढ उतार सुरुच राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसाच्या वायद्यांमध्ये आज सुधारणा दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे वाढून ८७.५३ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील वायदे ६१ हजार ८०० रुपये प्रतिखंडीवर पोचले होते. वायद्यांमध्ये सुधारणा झाली असली तरी बहुतांशी बाजारातील भावपातळी कायम होती.
बाजार समित्यांमध्ये कापसाचा भाव ७ हजार३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान कायम होता. बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. बाजारातील कापूस आवक आणखी कमी होत जाईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
तुरीला मागणी वाढल्याने दरातही सुधारणा दिसून आली. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी भाव पुन्हा १० हजारांच्या दरम्यान आला. तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव ९ हजार ५०० ते १० हजार रुपये होता.
बाजारातील आवक घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमाग १०० रुपयांनी वाढलेले आहेत. बाजारातील मर्यादीत आवक आणि चांगला उठाव यामुळे हरभरा बाजारात सुधारणा दिसून आली. हरभऱ्याचा भाव सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. हरभऱ्याचे उत्पादन यंदा घटले.
मात्र पिवळ्या वाटाण्याची आयात, सरकारची स्वस्त विक्री आणि नव्या मालाची आवक, यामुळे भावावर दबाव आहे. हरभऱ्याच्या भावात पुढील महीना दीड महिना १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासाकांनी व्यक्त केला.
बाजारातील आवक कमी असल्याने मिरचीला सध्या चांगला भाव मिळत आहे. मिरचीची आवक सध्या कमी दिसत असली तरी उठाव मात्र चांगला आहे. लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे.
सध्या हिरव्या मिरचीला ४ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे पुढच्या काळात मिरचीची आवक कमी होत जाईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.