
Crop Damage Maharashtra : राज्यात मॉन्सूनपूर्व पावसाने शेतीपिकांचं अतोनात नुकसान केलं आहे. मे महिन्यात दरम्यान अवेळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे शेती आणि फळपिकांचं ७७ हजार ३०० हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचं कृषी विभागाने प्राथमिक अंदाजात स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर मोठा आर्थिक फटका बसला असून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. परंतु अद्यापही राज्य सरकारकडून पंचनाम्याच्या आदेशाशिवाय कोणतीही हालचाल केली गेली नाही, असं शेतकरी सांगतात.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार मे महिन्यातील अवकाळी पावसाने बुलढाणा, अमरावती, अहिल्यानगर, नाशिक, अकोला, बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान केलं आहे. यामध्ये भात, मका, कांदा, ज्वारी, बाजरी, भुईमूग, तीळ, मूग, उडीद पिकांसह भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक कोंडी झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच काढणी नंतर पिकांचे नुकसान झाले असेल तर अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची ग्वाही दिली आहे. १० जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. परंतु अद्यापही शेतकरी प्रत्यक्ष मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
मॉन्सून हंगामात चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यात विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. परंतु ऐन मे महिन्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरकारी मदतीच्या आधाराची गरज आहे.
जिल्हानिहाय नुकसान- (९ जूनपर्यंत)
जिल्हा- बाधित क्षेत्र- बाधित पिकं
पालघर- ७९६ हेक्टर- केळी, जांभूळ, आंबा, भात चिक्कू
रायगड- ४२ हेक्टर- आंबा
ठाणे- ४७ हेक्टर- आंबा
रत्नागिरी- ८ हेक्टर- आंबा
सिंधुदुर्ग- ५ हेक्टर- आंबा, काजू, केळी, भुईमूग, कलिंगड, भात
नाशिक- ६ हजार ९७७ हेक्टर - बाजरी, मका, डाळिंब, आंबा, कांदा, भाजीपाला
धुळे- ६४५ हेक्टर- बाजरी, मका, कांदा, पपई, केळी
नंदुरबार- १४४ हेक्टर- बाजरी, कांदा, केळी
अहिल्यानगर- १० हजार ३७ हेक्टर - बाजरी, कांदा, भाजीपाला, चिकू, आंबा
पुणे- ६७८ हेक्टर - आंबा, बाजरी, मका, कांदा, भाजीपाला
सोलापूर- ४ हजार २२ हेक्टर- केळी आंबा, डाळिंब
सातारा- १०४ हेक्टर - आंबा, कांदा, डाळिंब
सांगली- ५८ हेक्टर - आंबा, डाळिंब, भुईमूग, पपई, भाजीपाला
कोल्हापूर- ९५ हेक्टर - केळी, आंबा, भात, भुईमूग, भाजीपाला, उडीद
जळगाव- ४ हजार ५३८ हेक्टर - मका, ज्वारी, भाजीपाला, बाजरी, कांदा, केळी, पपई, आंबा
लातूर- ९५७ हेक्टर- भाजीपाला, तीळ, मूग, केळी, भुईमूग
धाराशिव- ४८० हेक्टर - भाजीपाला, केळी, आंबा, भुईमूग, पपई
छत्रपती संभाजीनगर - ४५६ हेक्टर - भाजीपाला, केळी, आंबा, भुईमूग, पपई
जालना- १ हजार ७३१ हेक्टर - पपई, केळी, बाजरी, भाजीपाला
बीड- ५ हजार ४५० हेक्टर - केळी
परभणी - ४०२ हेक्टर - केळी
नांदेड - ७ हेक्टर - केळी, ज्वारी, तीळ
हिंगोली - ६४ हेक्टर - केळी, आंबा
बुलढाणा - १४ हजार २१६ हेक्टर - उडीद, मूग, मका, पपई, कांदा, भाजीपाला, केळी
अमरावती- १४ हजार ३२४ हेक्टर - मूग, कांदा, ज्वारी, केळी, संत्रा
अकोला- ४ हजार ४५० हेक्टर - कांदा, लिंबू, ज्वारी, तीळ, भुईमूग, मूग, उडीद, केळी पपई
यवतमाळ- २९० हेक्टर - मूग, भुईमूग, केळी, ज्वारी, पपई, भाजीपाला
वाशिम- २२४ हेक्टर - मूग, उडीद, भुईमूग, केळी, आंबा, लिंबू
वर्धा - ४२५ हेक्टर - तीळ, भाजीपाला, संत्रा, केळी, पपई
नागपूर- ९७ हेक्टर - भात, संत्रा, मोसंबी, भाजीपाला, उडीद, मूग
चंद्रपूर- १ हजार ८६५ हेक्टर - मका, धान, फळपिकं
भंडारा - १ हजार ५४१ हेक्टर - भात, फळपिकं
गोंदिया - १ हजार ४५ हेक्टर - भात, भाजीपाला, फळपिकं
गडचिरोली - ९८० हेक्टर - भात, मका, आंबा व इतर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.