Crop Loan : अकोला जिल्ह्यात ६१ टक्के शेतकऱ्यांना ८११ कोटींचे पीककर्ज वितरित

Kharif Season 2025 : यंदाच्या खरीप हंगामासाठी १३२० कोटींचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण १ लाख ३२ हजार शेतकरी खातेधारकांना कर्ज देण्याचे लक्ष ठरवले गेले.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Akola News : खरीप हंगामात पीककर्जाची निकड असताना अकोला जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. प्रशासनाकडून ठरवण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६१.४७ टक्के पिककर्जाचे वाटप झाले असून ८११ कोटी ४७ लाख रुपये इतके कर्ज ६९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र, अजूनही ६७ हजारांहून अधिक शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत, हे वास्तव चिंतेची बाब ठरत आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी १३२० कोटींचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत एकूण १ लाख ३२ हजार शेतकरी खातेधारकांना कर्ज देण्याचे लक्ष ठरवले गेले. मात्र, १० जुलैपर्यंत केवळ ६९ हजार शेतकऱ्यांना कर्ज मिळाले, म्हणजेच वाटपाचा वेग अपेक्षेपेक्षा कमी आहे.

Crop Loan
Crop Loan : सांगली जिल्हा बँकेकडून ८०१ कोटींचे कर्जवाटप

यात सार्वजनिक बँकांनी १८८१० शेतकऱ्यांना २३२ कोटी ११ लाख, खासगी बँकांनी ८११ शेतकऱ्यांना २१ कोटी ८५ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ७४०२ शेतकऱ्यांना १०७ कोटी, जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४१ हजार ९८१ शेतकऱ्यांना ४५० कोटी रुपयांचे आजवर वितरण केले. एकूण २६ बँकांनी २२९ शाखांमधून ६९ हजार ४ खातेदार शेतकऱ्यांना ८११ कोटी ४७ लाख रुपयांचे वितरण केले.

कर्जवाटपाची गती संथ

कर्ज वितरण प्रक्रियेत बँकांच्या अकार्यक्षमतेबरोबरच कागदपत्र तपासणीतील विलंब, तांत्रिक अडचणी व शेतकऱ्यांना वेळेवर माहिती न मिळणे या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी जुने कर्ज भरलेले नाही. शासनकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्जमाफीची घोषणा केली होती. या मुळे कर्ज भरण्यावर मोठा विपरीत परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांनी या आशेने कर्ज भरणाच केला नाही.

Crop Loan
Crop Loan : ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद

परिणामी ते थकीत झाले आहेत. शिवाय बँकांकडूनही वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप केला जात आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, मशागत, मजुरी, औषधे यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भांडवलाची गरज असते. कर्ज वितरणात होणाऱ्या विलंबामुळे काही शेतकऱ्यांना बाजारातून उधारीवर साहित्य घेण्याची वेळ आलेली आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रत्येक बँकेकडून कर्ज वितरणाचे तपशीलवार अहवाल मागवून निष्क्रिय शाखांवर कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, प्रशासन केवळ बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना इशारा देऊन मोकळे होत असल्याचे वारंवार दिसून आलेले आहे. कुठलीही कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात नसल्याने बँकांचे प्रशासन ऐकण्यास तयार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com