
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२५-२६ करिता दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. खरीप हंगामासाठी ३० जूनअखेर १४३१ कोटींचे पीक कर्जवाटप करून उद्दिष्टाची ११० टक्के पूर्तता केली आहे.
तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे शेती कर्जाची वेळेत परतफेड केल्याने या वर्षीही शेती कर्जाची विक्रमी ९७.०७ टक्के वसुली करत राज्यात आघाडी घेत आदर्श निर्माण केला आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, खासदार नितीन पाटील यांनी दिली आहे.
यासंदर्भात खासदार नितीन पाटील यांनी म्हटले, की बॅंकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत विकास सेवा संस्था पंचकमिटी, सचिव व बँकेच्या वसुली यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. बँकेशी बांधिलकी असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या वर्षी प्रामाणिकपणे शेती कर्जाची वेळेत परतफेड केली आहे.
त्यामुळे बॅंकेची वसुलीची परंपरा कायम राखत शेती कर्जाची विक्रमी ९७.०७ टक्के वसुली झाली आहे. यातून बॅंकेने वसुलीचा राज्यात आदर्श निर्माण केला आहे. तसेच नियमित व वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज परतावा मिळत असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जाबरोबरच शैक्षणिक कर्जही ‘शून्य’ टक्का व्याजाने मिळत आहे.
त्याचप्रमाणे मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याजाचा परतावाही वेळोवेळी दिलेला आहे. जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२५-२६ करिता जिल्ह्याचे एकूण पीक कर्जवाटप उद्दिष्ट ३६०० कोटी रुपयांचे होते.
त्यापैकी सातारा जिल्हा बँकेस ६१ म्हणजे २२०० कोटी उद्दिष्ट दिले आहे. त्यामध्ये खरीप पिकांसाठी १३०० कोटी व रब्बीसाठी ९०० कोटी उद्दिष्ट आहे. बँकेने खरीप हंगामाची पूर्तता करताना ३० जूनअखेर १४३१ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. यातून उद्दिष्टाची ११० टक्के पूर्तता झाली आहे.
या वर्षीच्या हंगामात पीककर्ज वसुलीसाठी सहकार्य केल्याबद्दल सहकार विभाग, सचिव संघटना, सर्व विकास सेवा संस्थांचे अध्यक्ष, पंचकमिटी सदस्य व सर्व शेतकऱ्यांचे बँकेच्या वतीने आभार मानले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासदांनी बँकेच्या सर्व कर्ज योजना व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.