Agriculture Expo 2024 : कृषी प्रदर्शनात शेतीतील श्रम व वेळ यांची बचत करणारे विविध तंत्रज्ञान सादर केले आहे. त्यात ‘सोलर हायड्रोपोनिक’, सौरऊर्जेवरील झटका यंत्र, ड्रोन तंत्रज्ञान यांसारखे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान जाणून घेण्याकडे विशेषतः तरुण शेतकऱ्यांचा कल दिसून येतो आहे.
शेतीत फळबागांसह आणि अन्य पिकांवर फवारणी करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. ड्रोनद्वारे कमी कालावधीत एक एकरात फवारणी करता येते. ड्रोन चालविण्यासाठी सरकारची कायदेशीर संमती लागते. कमाल ३० फूट उंचीपर्यंत ते उंच उडविता येते. पाच ते सात लाख रुपयांपर्यंत त्याची किंमत आहे.
त्यासाठी ५० टक्के अनुदानही सरकारकडून मिळते. बचत गटांनाही अनुदानावर ते घेता येईल अशी माहिती ‘ॲरोनिका ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे विवेक गवळी व ‘रुचा यंत्र एलएलपी’चे यश ठाकूर यांनी दिली. सौरऊर्जेवर आधारित प्रगत सोलर हायड्रोपोनिक व फवारणी पंप तंत्राचे दालनही लक्षवेधी ठरत आहे. ऑटो स्टुडिओ
ॲग्रो या कंपनीने हे तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. सौरऊर्जेवर आधारित हे तंत्रज्ञान प्रथमच बाजारात आले आहे. हायड्रोपोनिक तंत्रावर आधारित चारा उत्पादन पशुधनासाठी लाभदायी व फॅट्स वाढविणारा आहे. अन्य हायड्रोपोनिक तंत्राच्या तुलनेत या तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादनातील ५० टक्के खर्च कमी करता येतो असे कंपनीचे प्रतिनिधी अनिकेत राऊत यांनी सांगितले.
सोलर झटका यंत्र
श्री कृषी एन्टरप्रायजेस यांनी सौर उर्जेवर आधारित तयार केलेले तार कुंपण किंवा झटका यंत्र प्रदर्शनात पाहण्यास मिळते. या यंत्रणेत तीन तारांद्वारे कुंपण उभारले जाते. त्यास सौर यंत्रणेद्वारे वीज सोडली जाते. या कुंपणास हात लावल्यास किंवा प्राण्याचा धक्का लागल्यास प्राणी किंवा व्यक्तीस कोणतीही इजा होत नाही. फक्त हलका धक्का बसतो. त्यामुळे नुकसान करू पाहणारे प्राणी पळून जातात. परिणामी शेतीचे संरक्षण होते असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.