Agrowon Agriculture Exhibition 2024 : सौरऊर्जा उपकरणे, ड्रोन तंत्रज्ञानाने वेधले लक्ष

Agriculture Exhibition : प्रदर्शनात सौरऊर्जेची विविध उपकरणे, दूध उत्पादनवाढीसाठी आवश्यक उत्पादने, मिनी डाळ मिल, हायड्रोपोनिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या दालनावर माहितीसाठी शेतकऱ्यांची उत्सुकता दिसून आली.
Agriculture Exhibition
Agriculture ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Agriculture Expo 2024 : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी (ता. १२) शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रदर्शनात सौरऊर्जेची विविध उपकरणे, दूध उत्पादनवाढीसाठी आवश्यक उत्पादने, मिनी डाळ मिल, हायड्रोपोनिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या दालनावर माहितीसाठी शेतकऱ्यांची उत्सुकता दिसून आली. यासह अनेक शेतकऱ्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांवर उपयुक्त अशी माहिती मिळाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.

प्रदर्शनामध्ये सौरऊर्जा उपकरणे, डाळ मिल, ड्रोन तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळाली. आगामी काळात डाळ मिल सुरू करण्याचे नियोजन आहे.

-सुभाष जाधव, खानापूर, ता.जि. परभणी

मी ॲग्रोवनचा नियमित वाचक आहे. आजच्या प्रदर्शनात हस्तचलित कृषी अवजारांची माहिती मिळाली. टोमॅटो, आले, ड्रॅगनफ्रूट लागवड तंत्रज्ञानाची पुस्तके खरेदी केली.

- बी. एन. पाटील, पारोळा, ता.जि. जळगाव

Agriculture Exhibition
Agriculture Expo : सिल्लोडच्या कृषी महोत्सावांसाठी ५४ लाखांची उधळण

आम्ही दोघे पती, पत्नी जोडीने शेती करतो. आम्ही ऊस, कापूस, कांदे, गहू उत्पादन घेतो. प्रदर्शनात हळद पावडर, वांगी, मुळा, मिरची, कोथिंबीर बियाण्याची खरेदी केली.

- संगीता वाळके, गोगरगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर

आमच्या बोअरला खारे पाणी आहे. ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शानात खारे पाणी गोडे करण्याच्या तसेच बोअरची पाणीपातळी वाढविणाऱ्या

तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळाली..

- अंबादास खेळकर, भोनगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा

प्रदर्शानातील ‘लढा दुष्काळाशी’ या दालनातील शेतकऱ्यांच्या यशकथा व तज्ज्ञांचे लेख निश्‍चितच शेतकऱ्यांना उभारी देणारे आहेत. या यशकथा पुस्तक रूपाने प्रसिद्ध कराव्यात. त्यामुळे अधिकाअधिक शेतकऱ्यापर्यंत त्या पोहोचतील.

-सुरेश पाटील, नवलनगर, ता. जि. धुळे

आम्ही पारंपरिक पिकांच्या जोडीला सीताफळाची लागवड आहे. या शेतीतून अधिक नफा मिळविण्यासाठी काय करता येईल? या उद्देशाने ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाला भेट दिली. आधुनिक अवजारांची माहिती मिळाली.

- सतीश नारखेडे, जानेफळ, ता. मेहकर, बुलडाणा

ॲग्रोवनतर्फे आयोजित कृषी प्रदर्शनात शेती, पूरक, आधुनिक फवारणी तंत्रज्ञान, सौरऊर्जा आदी विषयांवर माहिती मिळाली. ही माहिती शेतीसाठी उपयुक्त आहे.-

- राहुल पाटील, चिकलठाणा ता.जि. छत्रपती संभाजीनगर

विजेची समस्या नजीकच्या काळात तीव्र होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सौरऊर्जेचा पर्याय पूरक ठरतो का, याची चाचपणी करता यावी, याकरिता ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाला भेट दिली. आज प्रदर्शनातील अनेक दालनांना भेट

देतेवेळी सौरऊर्जेसोबतच इतरही तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळाली.

- संजय मुळे, जानेफळ, मेहकर, जि. बुलडाणा

Agriculture Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : दुसऱ्या दिवशीही प्रदर्शनाला अलोट गर्दी

शेतीमध्ये नवे करण्याचा उत्साह असला, तरी मार्गदर्शकच मिळत नव्हते. ॲग्रोवनच्या वाचनातून बऱ्यापैकी शेती क्षेत्रातील नव- तंत्रज्ञानाची माहिती मिळते आहे. ही माहिती प्रत्यक्ष अनुभवता यावी, याकरीताच मी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलो. या ठिकाणचा अनुभव समृद्ध करणाराआहे.

अतुल सावंत, पाथरी, परभणी

पारंपरिक शेती कसण्यावर आजवर भर दिला. तंत्रज्ञान आधारित शेतीची माहिती व्हावी, असे वाटत असले तरी त्याविषयी नेमकी माहिती कुठे मिळेल हे कळत नव्हते. त्यातून ॲग्रोवन कृषी प्रदर्शनाची माहिती मिळाली. गावातील इतर महिलांसोबत या ठिकाणी येत अनेक बाबी जाणून घेता आल्या.

- कौशल्याबाई जंगले, कनगाव, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर

आमच्या भागात कापूस व इतर पिके आहेत. अलीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादन घेणे खर्चिक बनत चालले आहे. लागवडीसाठी योग्य वाण, फवारणीसाठी कीडनाशके यांची माहिती हवी होती. आजच्या प्रदर्शनातून योग्य आणि प्रेरक माहिती मिळाली.

- राम धाडगे, लाडगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर

शेती अलीकडे जोखमीची झाली आहे. प्रदर्शनात शेती नफ्यात आणण्यासह आवश्यक नव-तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. ही माहिती शेतीच्या व्यवस्थापनात लाभदायी व मार्गदर्शक आहे.

- माणिक खिल्लारे, शिंगणापूर ता. जि. परभणी

अलीकडील काळात समस्या, बाजारातील मागणीत मोठे बदल होत आहेत. तसेच फळबागांचे व्यवस्थापन करून त्या नफ्यात कशा आणता येतील, याची नेमकी माहिती या प्रदर्शनातून मिळाली.

-विष्णू भगवान निर्वळ, रुडी, ता. मानवत, जि. परभणी

या प्रदर्शनात पीक व्यवस्थान तंत्रज्ञानासह कीडनाशके, विविध वाण यांची माहिती मिळाली. त्याचा उपयोग शेतीत व्यवस्थापनात करून दर्जेदार उत्पादन मिळविणे शक्य होईल.

-रमेश पवार, वजूर, ता. पूर्णा, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com