Agriculture Study Tour: शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी संधी 

Maharashtra Farmers Abroad: विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी २०२५-२६ या आर्थिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाच शेतकऱ्यांना संधी आहे.
Agriculture Study Tour
Agriculture Study TourAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती

१) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५ शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी संधी, त्यात महिला, पुरस्कारप्राप्त व स्पर्धा विजेते शेतकरी प्राधान्य.

२) अभ्यास दौऱ्यांत युरोप, इस्राईल, जपान, कोरिया, चीन यांसारख्या उन्नत कृषी देशांचा समावेश.

३) शेतकऱ्यांनी आठ दिवसांत अर्ज सादर करावा, तालुका कृषी कार्यालयातून नमुना अर्ज मिळेल.

४) अर्जदाराचे वय २५ ते ६० दरम्यान, स्वतःच्या नावावर शेती असावी व नियमित शेती करणारा असावा.

५) ५०% खर्च अथवा कमाल ₹1 लाख अनुदान – जे कमी असेल ते देण्यात येईल.

Chhatrapati Sambhajinagar: विदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी २०२५-२६ या आर्थिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाच  शेतकऱ्यांना संधी आहे.त्यात एक महिला शेतकरी, एक केंद्र/राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी व पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर तीन शेतकरी असतील असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी कळविले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. २०२५-२६ साठी राज्य पुरस्कृत या योजनेत युरोप (नेदरलॅण्ड, जर्मनी, स्वित्झरलॅंड, फ्रान्स), इस्राईल, जपान, मलेशिया (व्हिएतनाम व फिलिपाईन्स), चीन व कोरिया या देशांचा समावेश आहे.

Agriculture Study Tour
Agrowon Dubai Agricultural Export Study Tour : ‘ॲग्रोवन’तर्फे जुलैमध्ये दुबईला शेतीमाल निर्यात अभ्यास दौरा

इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचना व विहित नमुन्यातील अर्ज तातडीने आपले तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त करावा व संपूर्ण भरलेला अर्ज तातडीने येत्या आठ दिवसात तालुका कृषी कार्यालयाकडे सादर करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले आहे.

Agriculture Study Tour
Agriculture Study Tour : शेतकऱ्यांनी जाणले रसायनमुक्त शेतीचे धडे

...असे आहेत निकष

स्वतःच्या नावावर शेती असलेला,नियमित शेती करणारा,उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असलेला असावा. वय २५ ते ६० वर्षांदरम्यान असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी आणि शेतीविषयक नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली असावी.

शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे व वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शासकीय/निमशासकीय/खासगी नोकरी करत असलेले अर्जदार पात्र ठरणार नाहीत.तसेच डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार नसावा.

शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून विदेश दौरा केलेला नसावा. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लक्ष रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

१) विदेश अभ्यास दौऱ्यासाठी कोण पात्र आहे?
वय २५–६०, स्वतःच्या नावावर शेती, शेतीत उल्लेखनीय काम करणारा शेतकरी पात्र आहे.

२) विदेश दौऱ्याचा अनुदान किती आहे?
एकूण खर्चाच्या ५०% किंवा ₹1 लाख – जे कमी असेल ते अनुदान मिळते.

३) कोणते देश दौऱ्यासाठी निवडले आहेत?
युरोपातील नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, इस्राईल, जपान, कोरिया, मलेशिया इत्यादी.

४) अर्ज कुठे व कसा सादर करावा?
तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून अर्ज घेऊन, आठ दिवसांत भरून जमा करावा.

५) कोण अपात्र ठरतो?
नोकरी करणारे, डॉक्टर, वकील, अभियंता, कंत्राटदार आणि आधी विदेश दौरा केलेले शेतकरी अपात्र आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com