Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’वर राज्यसभेत मंगळवारी चर्चा

RajyaSabha Debate: पहेलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकविरोधात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राज्यसभेत मंगळवारी (ता. २९) चर्चा घेतली जाणार आहे.
Parliament
ParliamentAgrowon
Published on
Updated on

New Delhi News: पहेलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकविरोधात राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राज्यसभेत मंगळवारी (ता. २९) चर्चा घेतली जाणार आहे. राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी (ता. २३) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, बिहारमधील मतदार याद्यांची सखोल पडताळणी आणि अन्य विषयांवरून विरोधी पक्षांनी घातलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे बुधवारचे दिवसभराचे कामकाज वाया गेले.

Parliament
Parliament Session 2025 : केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे महागाई नियंत्रणात; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं लोकसभेत उत्तर

लोकसभेप्रमाणे राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा घेण्यासाठी १६ तासांची निश्‍चिती करण्यात आली आहे. लोकसभेत या विषयावर सोमवारी (ता. २८) तर राज्यसभेत मंगळवारी (ता. २९) चर्चा होईल. ऑपरेशन सिंदूरवर गुरुवारी (ता. २४) चर्चा घेण्याचा आग्रह विरोधी पक्षांनी धरला होता.

Parliament
Monsoon Session of Parliament: संसदेचे पावसाळी अधिवेशन विजयोत्सवाचे : पंतप्रधान मोदी

तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर जात असल्याने पुढील आठवड्यात चर्चा घेण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला. कामकाज सल्लागार समितीची दर आठवड्याला बैठक घेतली जावी, अशी मागणीही विरोधकांकडून करण्यात आली.

ऑपरेशन सिंदूरवरील संसदेतील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा तसेच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही सदनांत हजर राहू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com