
Chhatrapati Sambhajinagar News: कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपत आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभासाठी केवळ ६ दिवसांचा अवधी शिल्लक असल्याचे महावितरणने कळविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला किंवा ताबेदारास थकबाकी चुकत नाही. ती भरावीच लागते. दोनवेळा मुदतवाढ मिळालेल्या या योजनेस पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे. यासोबतच सुरुवातीस मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीही सोय आहे.
तसेच लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवर नव्याने जोडणी दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असून थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.
अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपमध्ये सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाइन शक्य नसल्यास अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा.
८६४९ ग्राहकांनी घेतला लाभ
छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ८६४९ ग्राहकांनी आतापर्यंत अभय योजनेचा लाभ घेत १३ कोटी ४२ लाखांचा भरणा केला आहे. त्यापैकी ४ हजार ६८६ ग्राहकांनी आहे त्या कनेक्शनची पुर्नजोडणी केली. तर ३ हजार १६१ ग्राहकांनी नव्याने वीज जोडणी घेतली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.