
Latur News : वीज सेवेच्या क्षेत्रातील लाइनमन हा महावितरणचा चेहरा आहे. घरोघरी प्रकाश देणारा दुवा असल्याने लाईनमनने आपल्या सुरक्षेला प्राध्यान्य देत ग्राहकाभिमुख सेवा देण्याच काम करत कंपनीच्या आर्थिक स्थैर्यासाठी संपूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत रहावे असे विचार व्यक्त करत मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी तिसऱ्या लाइनमन दिनाच्या सर्व लाइनमन-वुमनला शुभेच्छा दिल्या.
लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्योग भवनमध्ये मंगळवारी (ता. ४) लाइनमन दिवस साजरा करण्यात आला. कार्यकारी अभियंता गणेश सामसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, सहायक महाव्यवस्थापक चेतन वाघ, उपकार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे, श्रीशैल्य लोहारे, शैलेश पाटील व विद्युत निरिक्षक बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी लातूर विभागातील सर्व लाईनमनना पुष्पगुच्छ व हॅडी स्पिकर देऊन गौरवण्यात आले. मुख्य अभियंता बुलबुले म्हणाले, ``वीजसेवा देत असताना किंवा वीजपुरवठा सुरळीत करत असताना बहुतांशी लाइनमन शॉर्टिंग रॉडचा वापर करत नाहीत परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते.
त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करावा. यामुळे किमान ८० टक्के अपघात टाळता येतात. अपघात विरहित सेवे बरोबरच कार्यक्षमता अबाधित ठेवत आपल्या परिमंडळाची वसुली क्षमता वाढवायची आहे. त्याद्ष्टीने नियोजनबध्द काम करत सांघिक कार्यालयाने दिलेले लक्ष्य साध्य करायचे आहे.
संपूर्ण कार्यक्षमतेने ग्राहक सेवा देत थकबाकीसह चालू वीजबिल वसुल करा असे आवाहन केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रमोद कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपकार्यकारी अभियंता ज्योती कुमठेकर यांनी केले. या वेळी लाइनमन व लाईनवुमनसह कर्मचारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.