Property Registration
Property RegistrationAgrowon

Property Registration : ‘एक जिल्हा, एक नोंदणी’ला महिन्यातच ग्रहण

One District One Registration : जमिन व स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री तसेच अन्य व्यवहाराच्या नोंदणीसाठी नागरिकांना जवळच्या व सोयीच्या ठिकाणी सोय व्हावी, म्हणून राज्य सरकारने नोंदणीच्या प्रक्रियेत मोठे पाऊल उचलले आहे.
Published on

Latur News : जमिन व स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री तसेच अन्य व्यवहाराच्या नोंदणीसाठी नागरिकांना जवळच्या व सोयीच्या ठिकाणी सोय व्हावी, म्हणून राज्य सरकारने नोंदणीच्या प्रक्रियेत मोठे पाऊल उचलले आहे. यातूनच ‘एक राज्य एक नोंदणी’ कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेत मालमत्तांची राज्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे.

याचा पहिला भाग म्हणून एक मेपासून जिल्हास्तरावर ‘एक जिल्हा एक नोंदणी’ उपक्रम सुरु केला. मात्र, महिन्यातच या उपक्रमाला गालबोट लागले असून अधिकाऱ्यांनी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे नोंदणी प्रक्रियेत अनेक गैरप्रकार घडले आहेत. यामुळे महिन्याच खबरदारीच्या सूचना काढण्याची वेळ सरकारवर आली आहे. सरकारने शुक्रवारी (ता. ६) काढलेल्या परिपत्रकात गैरप्रकाराची माळ जपत उपाययोजनांही सांगितल्या आहेत.

या परिपत्रकामुळे काही अधिकाऱ्यांनीच या चांगल्या उपक्रमाला गालबोट लावल्याची आहे. उपक्रमात सध्या जिल्ह्यातील कोणत्याही मालमत्तेशी संबंधित व्यवहाराची नोंदणी त्याच जिल्ह्यातील कोणत्याही रजिस्ट्री कार्यालयात करणे शक्य झाले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणचे दुय्यम निबंधक कार्यालयात नियम धाब्यावर बसवून व्यवहाराची नोंदणी (रजिस्ट्री) करता दिसतात.

Property Registration
Property Partition: झालेली वाटणी पुन्हा उघड करण्याची कारणे

काही दुय्यम निबंधक (रजिस्ट्रार) यात माहिर असून त्यांची नियमबाह्य रजिस्ट्री करून घेणारांना चांगलीच ओळख आहे. पूर्वी हे अधिकारी दस्त नोंदणीची संख्या असलेल्या कार्यालयात काही दिवस अतिरिक्त पदभार घेऊन कमाई करत होते. त्यांना एक जिल्हा एक नोंदणीमुळे अतिरिक्त पदभार न घेता त्यांच्याच कार्यालयात कमाई करण्याची आयतीच संधी मिळाली आहे.

यामुळे गेल्या महिन्यात असे नियमबाह्य काम करणारे दुय्यम निबंधक असलेल्या कार्यालयात रजिस्ट्रीची संख्या लक्षणीय वाढली आहे. यातूनच रजिस्ट्री प्रक्रियेतील गैरप्रकारांना चालना मिळाली असून महिन्यातच ‘एक राज्य एक नोंदणी’चे पहिले पाऊल असलेल्या ‘एक जिल्हा एक नोंदणी’ उपक्रमातील गैरप्रकार रोखण्यासाठी शुक्रवारी खबरदारीच्या सूचना काढल्या आहेत. हा उपक्रमामुळे मालमत्तेशी संबंधित वादात भर पडणार असल्याने तो रद्द करण्याची मागणीही होत आहे.

Property Registration
Ancestral Property: वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी कायदेशीर हक्क

सरकारच्या मते होत असलेले गैरप्रकार....

बनावट व्यक्ती उभे करून दस्त नोंदणी करून घेणे

मृत व्यक्तीस जिवंत असल्याचे दाखवून दस्त नोंदणी करून घेणे

शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या लगतच्या जमिनी शेतकऱ्यांची फसवणूक करून खरेदी व विक्री करणे

एकाच कुटुंबातील मालमत्तेचे हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्से विकणे

सामाईक मालकीच्या इमारतीत एकाच हिस्सेदाराने लीज डीड करणे

रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदा बांधकामातील फ्लॅट्स व प्लॉट विक्री करणे

सातबारावर इतर अधिकारात सरकारचे नाव असताना दस्त नोंदणी करणे

भूसंपादनाचे सरकारी शिक्के पडलेले असताना दस्त नोंदणी करणे

धर्मादाय आयुक्त न घेतात न्यासांच्या मिळकती विकणे अगर भाड्याने देणे

देवस्थानच्या जमिनी पुजारी किंवा गुरव यांच्या नावावर असल्याने त्याचे बेकायदा दस्त करणे

निरक्षरांना धनादेश न देता दस्तामध्ये मोबदला नमूद न करणे

कमी मुद्रांक शुल्काचे दस्त नोंदवून सरकाचा महसूल बुडवणे

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सूचना

दस्त नोंदणी करताना संबंधित कायदे, नियम व परिपत्रकांतील सूचना व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करा

दस्तास कमी मुद्रांक शुल्क आकारणी होणार नाही व शासनाचा महसूल बुडणार नाही याची विशेष दक्षता घ्या

दस्त नोंदणी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून नागरिक व शेतकरी यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या

नोंदणी कायद्यानुसार कारवाई कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाल्यास सात दिवसात गुन्हा दाखल करा

मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी करून दर पंधरा दिवसाला अहवाल सादर करा

दस्त नोंदणीमध्ये होणाऱ्या विविध गैरप्रकारांचे प्रकार, स्वरूप व कार्यपद्धती लक्षात घेवून प्रभावी उपाययोजना करा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com