Automated Weather Stations : पावसाच्या अचूक आकड्यांसाठी हवी स्वयंचलित हवामान केंद्रे

Farmers Loss : पर्जन्यमान तसेच अन्य हवामान घटकांच्या सदोष नोंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे आढळून आले.
Weather Station
Weather StationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : पर्जन्यमान तसेच अन्य हवामान घटकांच्या सदोष नोंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ऑगस्ट २०२३ मध्ये जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील १९ मंडलांतील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या (ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) जागा बदलण्यात आल्या आहेत. ही केंद्रे नवीन जागेवर स्थापित करण्यात आली आहेत.

गेल्या काही वर्षांत पावसाचे असमान वितरण होत आहे. महसूल मंडलाचे ठिकाण आणि मंडलातील इतर गावशिवारांत पडलेला पाऊस यामध्ये मोठी तफावत येत आहे. त्यामुळे शेतकरी पीकविमा, नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत. पावसासह विविध हवामान घटकांच्या अचूक आकडेवारीसाठी प्रत्येक गावांत स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करण्याची गरज आहे.

Weather Station
Weather Station : प्रत्येक गावामध्ये का असावे हवामान केंद्र?

अतिवृष्टी, तापमान वाढ, गारपीट आदी नैसर्गिक संकटांमुळे बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ, तसेच आर्थिक मदत देण्यासाठी पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग आदी घटकांची अचूक नोंद होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महसूल मंडल स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र योग्य जागी स्थापित असावे.

मंडलाच्या मुख्यालयाच्या गावीच हे केंद्र असणे आवश्यक आहे. २०१७ मध्ये जिल्ह्यातील त्या वेळीच्या ३९ मंडलांत व त्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या १३ मंडले मिळून एकूण ५२ मंडलांत महावेध प्रकल्पांतर्गत स्कायमेटतर्फे ही केंद्रे स्थापित करण्यात आली.

मंडलाच्या मुख्यालयी महसूल, जलसंपदा, जिल्हा परिषद आदी विभागाच्या शासकीय जागेत ही केंद्रे आहेत. परंतु मुख्यालयाच्या गावी जागा नसल्यामुळे झरी (ता. परभणी) मंडलाचे केंद्र साडेगाव (ता. परभणी) येथे आहे. आवलगाव (ता. सोनपेठ) मंडलाचे केंद्र आधी करम येथे होते. आता ते कोठाळा येथे स्थापित केले आहे. परभणी ग्रामीण मंडलाचे केंद्र असोला (ता. परभणी) येथे आहे. रावराजूर (ता. पालम) येथील केंद्राची तोडफोड करण्यात आली.

अनेक ठिकाणच्या केंद्रांच्या परिसरात शासकीय कार्यालयाच्या तसेच खासगी इमारतींची बांधकामे झाली. परिसरात उंच झाडे आहेत. त्यामुळे पावसासह अन्य हवामान घटकांची अचूक नोंदी होण्यास अडथळे येत होते. त्यामुळे या केंद्रांची जागा बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

Weather Station
Weather Stations : कृषी महाविद्यालयाच्या हवामान केंद्रात घडताहेत तज्ज्ञ

या संदर्भात ‘अॅग्रोवन’ने सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रकल्प कृषी विभागाचा आहे. तर गावातील या जागा महसूल, ग्रामविकास विभागाच्या असतात. केंद्रासाठी जागा मिळविण्याची प्रक्रिया दीर्घ काळ चालते. केंद्राची काळजी ग्रामपंचायतींनी घेण्याची गरज आहे आहे, अशी माहिती संबंधित विभागाने दिली.

जागा बदललेली हवामान केंद्रे

तालुका मंडले

परभणी दैठणा, जांब, पेडगाव, टाकळी कुंभकर्ण

जिंतूर जिंतूर

सेलू वालूर, कुपटा

मानवत कोल्हा

पाथरी बाभळगाव, कासापुरी, पाथरी

सोनपेठ आवलगाव

गंगाखेड महातपुरी, माखणी

पालम पालम

पूर्णा कात्नेश्वर, लिमला, चुडावा, कावलगाव

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमुळे पावसासह अन्य घटकांची अचूक नोंदी होत नव्हती. त्यामुळे हवामान केंद्रांची जागा बदलण्याची मागणी होती. ‘अॅग्रोवन’च्या वृत्तानंतर ऑगस्टमध्ये येथील केंद्र जायकवाडी पाटबंधारे जागेवर स्थापित केले.
- बाबासाहेब रनेर, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी
प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित केल्यास पावसाच्या आकडेवारीतील अचूकता वाढेल. त्यानुसार शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन करता येईल. पीकविमा, नुकसानभरपाई मिळण्यास मदत होईल.
- हेमचंद्र शिंदे, शेतीचे अभ्यासक, रावराजूर, ता. पालम
गावपातळीवर स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित केल्यानंतर पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आदींची अचूक नोंद होईल. त्यानुसार उद्‍भवलेल्या परिस्थितीत उपाययोजनांसाठी सूक्ष्म नियोजन करता येईल.
- डॉ. कैलास डाखोरे, कृषी हवामानशास्त्रज्ञ ‘वनामकृवि’ परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com