Pune News: कृषी विभागातील अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी म्हणून निवृत्त सनदी अधिकारी डॉ. उमाकांत दांगट यांची नियुक्ती करण्यास आमदार सुरेश धस यांनी कडाडून विरोध केला आहे. डॉ. दांगट यांच्या नियुक्तीमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून चौकशीची सूत्रे डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे देण्याची मागणी आ. धस यांनी केली आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आ. धस यांनी अलीकडेच यासंदर्भातील पत्र राज्य सरकारला दिले आहे. ‘‘गैरव्यवहारांबाबत विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केलेले डॉ. उमाकांत दांगट पूर्वी कृषी आयुक्त होते. त्यांचे आणि कृषी विभागातील सर्व आजी-माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे चौकशी अधिकारी म्हणून डॉ. दांगट यांची नियुक्ती होताच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केल्याची माझी माहिती आहे.
त्यामुळेच गैरव्यवहाराची चौकशी डॉ. दांगट यांच्याकडून पारदर्शकपणे होईल, असे अजिबात वाटत नाही. माजी कृषी आयुक्तांकडूनच चौकशी करण्याचे राज्य शासनाचा उद्देश असेल तर डॉ. दांगट यांच्याऐवजी माजी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करावी.’’ डॉ. गेडाम सध्या नाशिकचे विभागीय आयुक्त आहेत.
कृषी विभागाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, की आमदार धस यांनी दिलेले पत्र कृषी विभागाला मिळाले आहे. परंतु, डॉ. दांगट यांना बदलण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. डॉ. दांगट यांचे नाव कृषी विभागाच्याच काही अधिकाऱ्यांनी सुचविले होते. मात्र कृषी आयुक्त, कृषी सचिव व कृषिमंत्री कार्यालयाने एकमताने हा निर्णय घेतला होता. डॉ. दांगट यांनी अद्याप चौकशी सुरू केलेली नाही. त्यांच्या कामकाजाची दिशादेखील स्पष्ट झालेली नाहीत. या स्थितीत डॉ. दांगट यांना बदलण्याची मागणी झाल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
सूत्रांच्या मते मात्र आ. धस यांची मागणी अजिबात मान्य होणार नाही. एकवेळ डॉ. दांगट यांना बदलणे शक्य आहे; मात्र त्यांच्या जागी डॉ. गेडाम यांची नियुक्ती करण्यास कृषी विभागातील अधिकारी अजिबात तयार होणार नाहीत. कारण डॉ. गेडाम यांच्या स्वच्छ व शिस्तप्रिय कारभाराचा तडाखा अधिकाऱ्यांना यापूर्वीच बसलेला आहे. मात्र थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला तरच डॉ. गेडाम यांच्या नावाबाबत विचार होऊ शकेल. परंतु तशी स्थिती सध्या तरी दिसत नाही, असे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील कृषी खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असून कृषी निविष्ठा कंपन्यांमध्ये काही अधिकाऱ्यांची छुपी भागीदारी आहे, असे आरोप आ. धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केले होते. त्याची चौकशी करण्यासाठी कृषी खात्याने आधी आवटे समिती आणि नंतर दांगट समिती नेमली.

सुनील केंद्रेकर, दीपा मुंडे यांचाही पर्याय
डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नावावर एकमत होत नसेल तर माजी कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर किंवा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुंडे मुधोळ यांच्या नावांचा विचार व्हावा, असे आ. धस यांनी सुचवले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.