Rohit Pawar On Farmers Issue: कृषिमंत्री कोकाटेंवर रोहित पवारांचा हल्लाबोल; 'मिस्टर जॅकेट' म्हणत केली टीका

Farmer First: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. पवार यांनी खोचकपणे ‘मिस्टर जॅकेट’ असा उल्लेख करत कृषिमंत्र्यांवर निशाणा साधला.
Rohit Pawar On Farmers Issue
Rohit Pawar On Farmers IssueAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. पवार यांनी खोचकपणे ‘मिस्टर जॅकेट’ असा उल्लेख करत कृषिमंत्र्यांवर निशाणा साधला. सुधारित पीक विमा योजनेच्या नवीन निकषांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि कृषिमंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्यांचा रोहित पवार यांनी समाचार घेतला. तसेच शेतकऱ्यांना मिळणारी मदत कमी करणाऱ्या धोरणांवर टीका करत कृषिमंत्र्यांना थेट चर्चेचं आव्हान रोहित पवारांनी दिलं.

रोहित पवार यांनी आज (ता.३) विधानसभेच्या बाहेर महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकास्र सोडले. "रोज सकाळी,दुपारी आणि संध्याकाळी कुठलं जॅकेट घालायचं असा विचार करणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांचा फाटका सदरा दिसत नाही. सुधारित पीक विमा योजनेबद्दल विचारलं असता कृषिमंत्री थातूर-मातुर उत्तर देतात.

Rohit Pawar On Farmers Issue
Kharif Crop Insurance Scheme : सुधारित पीक विमा योजनेचे निकष

पीक विम्याच्या नवीन निकषांबद्दल विचारलं असता तेही उत्तर देण्यासही टाळाटाळ करतात." असं रोहित पवार म्हणाले.रोहित पवार पुढे म्हणाले, "पीक विमा पॉलीसीतील नवीन बदलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. पूर्वीच्या पॉलीसीमध्ये शेतकऱ्यांची पेरणी न झाल्यास मदत मिळण्याची आशा होती. स्थानिक आपत्ती तसेच काढणीपश्चात झालेल्या नुकसानीवरही  शेतकऱ्यांना जुन्या पीक विमा पॉलीसीमध्ये मदत मिळत होती.

Rohit Pawar On Farmers Issue
Crop Insurance: पीक विमा भरपाईचे ट्रीगर कमी करू नका; विरोधकांचा कृषिमंत्र्यांवर निशाणा

आता त्या सर्व श्यक्यता मावळल्या आहेत." वेगवेगळे निकष वापरून ६ हजार कोटी वाचवा आणि तेच पैसे शक्तिपीठ महामार्गासाठी वापरा अस सरकारचं धोरण असल्याचा आरोपही पवारांनी केला. ते म्हणाले, "सामान्य शेतकऱ्यांना २ हजार कोटी रुपये विम्याच प्रिमियम म्हणून भरावे लागतात. इतके पैसे भरायचे आणि मदत काहीच नाही. हा शेतकऱ्यांसोबत सोबत अन्याय ठरेल." असंही पवार यांनी सांगितलं. 

मागील काळात हे कृषिमंत्री वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी ‘कृषीखात म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी’, ‘ढेकळांचे पंचनामे करायचे का’?, ‘भिकारी सुद्धा १ रुपया घेत नाही’ अशी बेताल वक्तव्य केली आहेत. ज्या निकषांमधून सर्वात जास्त फायदा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून होत असतो. तेच निकष पीक विमा पॉलीसीमधून काढले. म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना मिळणारी मदतच कमी करून टाकली, असा आरोपही पवारांनी केला.

पुढे रोहित पवार यांनी कृषिमंत्र्यांना पीक विम्यावर चर्चेचं खुलं आव्हानही दिलं. "रोहित पवार सामान्य लोकांच्या वतीने तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहेत. माझ्यात दम आहे पण तुमच्यात मिस्टर जॅकेट दम आहे का? तर समोरा- समोर या आणि होऊन जाऊ द्या दुध का दुध आणि पाणी का पाणी!" असं आवाहनही कृषिमंत्र्यांना केलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com