Pest & Disease APP : शेतकऱ्यांना मोबाईलवरच मिळणार ४१ पिकांवरील किड व रोगांची अचूक माहिती; महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं शेतकऱ्यांसाठी अॅप

Mahatma Phule Agriculture University : या अॅपमध्ये पिकांनुसार माहिती आणि सोपी मांडणी करण्यात आलेली आहे. तसेच कीड रोगांची लक्षणे आणि प्रतिमा यावर आधारित ओळख देण्यात आली आहे. तर कीटकनाशक व बुरशीनाशकाची शिफारस करण्यात आली आहे.
Mobile APP
Mobile APPAgrowon
Published on
Updated on

Pest Control App : शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे बदलत्या काळाची गरज ओळखून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सेंटर ऑफ एक्सेलेन्स- स्मार्ट व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान 'फुले स्मार्ट पीडीएम' मोबाईल अॅप विकसित केलं आहे. या अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांना पिकानिहाय कीड व रोग ओळख आणि व्यवस्थापनाची शिफारसीची माहिती मिळणार आहे.

अॅपचे वैशिष्ट्ये काय?

विद्यापीठाने विकसित केलेल्या या अॅपचा फायदा शेतकरी, कृषी विद्यार्थी आणि संशोधकांना होणार आहे. या अॅपमध्ये पिकांनुसार माहिती आणि सोपी मांडणी करण्यात आलेली आहे. तसेच कीड रोगांची लक्षणे आणि प्रतिमा यावर आधारित ओळख देण्यात आली आहे. तर कीटकनाशक व बुरशीनाशकाची शिफारस करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या अॅपवरील माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती मिळणार आहे, असे कृषी विद्यापीठाने सांगितले आहे. या अॅपमधील माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थी आणि संशोधकांना फायदा घेता येणार आहे.

Mobile APP
MPKV Rahuri: महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाच महिन्यांपासून मिळेना कुलगुरू

कोणत्या पिकांची माहिती?

शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी या https://play.google.com/store/apps/details?id=com.mpkv.ppdm लिंकचा वापर करावा. मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करून इंस्टोल करावं. इंस्टोल केल्यानंतर अ‍ॅप ओपन करून स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला भाषेचा पर्याय निवडता येतो. तर खालील बाजूला होम, कीटकनाशक आणि बुरशीनाशक आणि अधिक असे चार पर्याय देण्यात आले आहेत. होम यावर क्लिक केल्यानंतर तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, नगदी पिके, भाजीपाला आणि फळ पिके अशी वर्गीकरण दिसेल.

तृणधान्यामध्ये भात, बाजरी, गहू, मका, ज्वारी, सातू पिकांवरील कीटक आणि रोगांची लक्षणे, प्रतिमा आणि व्यस्थापनाची माहिती देण्यात आली आहे. कडधान्यामध्ये हरभरा, तूर, मूग आणि उडीद, गळीतधान्यांमध्ये भुईमुग, सोयाबीन, सूर्यफुल, करडई, तीळ, तर नगदी पिकांमाध्ये ऊस आणि कापूस या पिकांवरील कीड व रोगांच्या लक्षणे, प्रतिमा आणि उपाययोजना देण्यात आले आहे.

तसेच भाजीपाला पिकांमध्ये कांदा, मिरची, टोमॅटो, भेंडी, वांगी, हळद, आले, वाटाणा, काकडी, कोबी, फुलकोबी, बटाटा आणि कारले तर फळ पिकांमध्ये आंबा, केळी, डाळींब, द्राक्ष, पेरू, पपई, कागदी लिंबू, संत्री, मोसंबी, नारळ आणि टरबूज पिकांवरील कीड आणि रोगाची लक्षणे, प्रतिमा आणि व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली आहे.

Mobile APP
MPKV Crop Variety : आठ वाण, ३ कृषी यंत्रे, ६१ तंत्रज्ञान शिफारशी

वरील सर्व पिकांमध्ये कोणती किडरोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यासाठी कोणती उपाययोजना कराव्यात, याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्ययावत आणि अचूक मार्गदर्शन मोबाईल अ‍ॅपवरच उपलब्ध झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com