MPKV Crop Variety : आठ वाण, ३ कृषी यंत्रे, ६१ तंत्रज्ञान शिफारशी

Joint AGRESCO : या तीन दिवसीय बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण, यंत्रांचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण करण्यात आले.
Paddy Varieties
Paddy Varieties Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील ‘वनामकृवि’मध्ये झालेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत (जॉइंट ॲग्रेस्को) महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांचे आठ वाण, तीन कृषी यंत्रे-अवजारे आणि ६१ कृषी तंत्रज्ञान शिफारशी प्रसारित करण्यात आल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसह शेती श्रम कमी करण्याला मदत होणार आहे.

या तीन दिवसीय बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण, यंत्रांचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर समितीने आठ वाण, तीन कृषी यंत्रे, एकसष्ठ कृषी तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता दिली. या वाणांमुळे व तंत्रज्ञान शिफारशींमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल व नवीन यंत्र व अवजारांमुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होतील, असा विश्वास डाॅ. गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी या वेळी व्यक्त केला.

Paddy Varieties
Fruit Crop Variety : निवड फळझाडांच्या जातींची

प्रसारित वाण

संकरित बाजरी - फुले मुक्ताई (डीएचबीएच २१०७५) : हा वाण अधिक धान्य उत्पादन देणारा (प्रती हेक्टरी ३०.३६ क्विंटल) त्यात लोहाचे प्रमाण ७५ पीपीएम आणि जस्त ४२ पीपीएम. घट्ट कणीस, टपोरे गोलाकार करड्या रंगाचे दाणे, गोसावी, करपा रोगास प्रतिकारक्षम. महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित.

भात ः फुले मावळ - ८ (व्हीडीएन - २००३) : हा वाण तुल्यवान - पवना पेक्षा वीस टक्के,कर्जत-७ पेक्षा १४.७८ टक्के जास्त उत्पादन देणारा, लवकर येणारा, न लोळणारा, दाणे न गळणारा. मानेचा करपा, तपकिरी ठिपके, पानाचा करपा, खोडकिडी रोगास मध्यम प्रतिकारक्षम. पश्चिम महाराष्ट्रात खरिपासाठी प्रसारित.

कारळा ः फुले कळसुबाई (आयजीपीएन - १८३४) : या वाणांत तेलाचे अधिक प्रमाण, चमकदार काळे दाणे, बोंडांची अधिक संख्या तसेच भुरी, मूळ व खोडकुज रोगास सहनशील. अधिक उत्पादन देणारा. खरिपासाठी प्रसारित.

Paddy Varieties
New Crop Variety : नव्या पीकवाणांचे बियाणे संकलित करा ः वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काळे

भेंडी ः फुले गायत्री (आर.एच.आर. ओ.के.एच.- ०१) : या वाणाला मध्यम आकाराची हिरवी फळे, येलो व्हेन मोझॅक, पांढरी माशी व फळ पोखरणाऱ्या अळीस मध्यम प्रतिकारक्षम. अधिक उत्पादन देणारा. लागवडीसाठी प्रसारित.

दुधी भोपळा ः फुले अनमोल (आरएचआरबीजी ३५) : हा वाण एकसारख्या दंडगोलाकार, हिरव्या रंगाची फळे असलेला, अधिक उत्पादन देणारा. महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित.

करडई ः फुले करडई (एसएसफएफ - ०७) : हा वाण अधिक उत्पादन देणारा अल्टरनेरिया, मावा कीड रोगास मध्यम प्रतिकारक्षम. पश्चिम महाराष्ट्रात पालेभाजीसाठी प्रसारित.

जांभूळ ः फुले नीलकंठ (आरएचआरजे - ७/१) : हा वाण जास्त वजनाची, मोठ्या आकाराची फळे, गराचे जास्त प्रमाण. अधिक टिकवणक्षमता. महाराष्ट्रासाठी प्रसारित.

मोसंबी ः फुले रसिका (सिलेक्शन नं. ७) : हा वाण रसाचे जास्त प्रमाण, क जीवनसत्वाचे अधिक प्रमाण.

प्रसारित यंत्रे

फुले स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित : मशागतीने पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी उपयुक्त. मशागतीसाठी लागणाऱ्या खर्चात आणि वेळेत बचत तसेच पारंपरिक पद्धतीने खर्चामध्ये ४४ टक्के बचत करणारा

फुले फळबाग तण कापणी यंत्र : फळबागेमध्ये तण कापणीकरिता उपयुक्त, फळबागेतील दोन ओळीतील अंतरानुसार रुंदी समायोजित करता येणारे तसेच २४ आणि त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरसाठी उपयुक्त.

फुले भुईमूग शेंगा तोडणी यंत्र : भुईमुगाच्या वेलीपासून शेंगा तोडणी करिता उपयुक्त असलेले, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तसेच एक अश्वशक्ति सिंगल फेज विद्युत मोटार चलित फुले भुईमूग शेंगा तोडणी यंत्र प्रसारित.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com