Seed Germination Issue: सोयाबीन बियाण्यांची ३० टक्केच उगवण

Farmer Loss: खासगी कंपनीकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता अत्यंत कमी असल्यामुळे संपूर्ण अडीच एकरांतील पिकावर त्यांनी मंगळवारी (ता. १५) सकाळी ट्रॅक्टर फिरवला.
Farmer Gangaram Motiram Khandre
Farmer Gangaram Motiram KhandreAgrowon
Published on
Updated on

Washim News: मंगरुळपीर तालुक्यातील मूर्तीजापूर येथील शेतकरी गंगाराम मोतीराम खंडरे यांना यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीलाच मोठा फटका बसला आहे. खासगी कंपनीकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता अत्यंत कमी असल्यामुळे संपूर्ण अडीच एकरांतील पिकावर त्यांनी मंगळवारी (ता. १५) सकाळी ट्रॅक्टर फिरवला. यामुळे त्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

श्री. खंडरे यांनी २५ जून रोजी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र यातील जवळपास ३० टक्केच बियाणे उगवले आणि उरलेल्या शेतात रोपेच दिसून आली नाहीत. बियाण्यांची उगवण क्षमता निकृष्ट असल्यामुळे अडीच एकर शेतामधील सोयाबीनचे पीक वाया गेले. बियाणे खासगी कंपनीकडून खरेदी करण्यात आले होते, परंतु बियाणे न उगवल्याने गुणवत्तेबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.

Farmer Gangaram Motiram Khandre
Farmers Issue : राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली

सोयाबीन बियाणे ३० टक्केच उगवल्याने खंडरे यांनी संपूर्ण शेत मोडून आता दुसरे पीक घेण्याचा नवा पर्याय निवडला आहे. आता एका एकरात मका, दुसऱ्या एक एकरात फुलकोबी आणि उर्वरित शेतात भाजीपाला लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे हंगाम वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण आधीच झालेल्या खर्चामुळे आर्थिक नुकसान झेलावे लागले. त्यांनी ही बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिली असून, ‘कृषी’च्या कर्मचाऱ्यांनी शेतात येऊन पाहणीही केली. परंतु कोणताही ठोस उपाय किंवा मदत झाली नसल्याची खंत खंडरे यांनी व्यक्त केली.

Farmer Gangaram Motiram Khandre
Farmer Issues: सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या अडीचशे तक्रारी

खासगी कंपन्यांच्या बियाण्यांबाबत तक्रारींचा ओघ

वाशीम जिल्ह्यात यंदाच्या मोसमात खासगी बियाणे कंपन्यांविरोधात फसवणुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. प्रामुख्याने बियाण्यांची उगवण क्षमता कमी असताना बाजारपेठेत खुलेआम विक्री केली, आता बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्याने कंपन्यांचे पितळ उघडे पडू लागले. काही ठिकाणी कंपन्यांकडून प्रकरणे मिटवण्याचेही प्रकार होत आहेत. कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांसमवेत चर्चेने तक्रारी मिटवत आहेत. मात्र अशा बोगस बियाण्यांमुळे हंगाम वाया जात आहे. हजारो रुपये खर्च करून मनस्ताप सोसावा लागत आहे.

खासगी कंपनीचे सोयाबीन बियाणे ३० टक्केच उगवले

अडीच एकरांतील पीक मोडून टाकले

२०,००० रुपये खर्च गेला वाया

आता मका, फुलकोबी आणि भाजीपाला लागवडीचा निर्णय

कृषी विभागाकडून पाहणी, मात्र अद्याप ठोस मदतीचा अभाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com